गायी 
नांदेड

देवाला सोडलेल्या गायी चोरणाऱ्या टोळीला ग्रामस्थांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

मांजरमवाडी (ता. नायगाव) येथील हनुमान मंदिरास श्रध्दाळू भाविकांनी चार गायी सोडल्या होत्या.

चंद्रकांत सुर्यतळ

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : मोकाट गायी टेम्पोमध्ये डांबून (Tempo in cow) चोरुन नेणाऱ्या चोरट्यांना मांजरमवाडी (ता. नायगाव) ग्रामस्थांनी पकडून नायगाव (जिल्हा नांदेड) पोलिसांच्या टेम्पोसह स्वाधीन केले. ही घटना ता. सहा मेच्या मध्यरात्री घडली. नायगाव पोलिस ठाण्यात (Naigaon police) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. The villagers caught the gang stealing cows left to God and handed them over to the police

या बाबत अधिक माहिती अशी की, मांजरमवाडी (ता. नायगाव) येथील हनुमान मंदिरास श्रध्दाळू भाविकांनी चार गायी सोडल्या होत्या. त्या दिवसभर चरुन रात्री जि. प. शाळेसमोरील मोकळ्या मैदानात विश्रांतीसाठी बसत असत. याचा पता ठेऊन मांजरम गावातील कसाई इसाख अब्दुल कुरेशी, बाबू अब्दुल कुरेशी, अहमद कुरेशी यांनी ता. सहा मेच्या मध्यरात्री आपे टेम्पो (एमएच 26 एडी8227) मध्ये टाकून नेत होते.

हेही वाचा - चांगली बातमी : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी भालकी हिरेमठ संस्थानचा पुढाकार

ह्या गायी नेताना आवाज झाल्याने गावातील काही ग्रामस्थ जागे झाले व संबंधीत चोरट्यांना रंगेहाथ पकडले. तात्काळ नायगाव पोलिस ठाणे येथे गायीसह टेम्पो व चोरी प्रकरणात वापरलेली एक दुचाकी पोलिसांच्या ताब्यात देऊन ग्रा. प. सदस्य खाकू व्यंकटी उलगुलवाड (वय 27) यांच्या फिर्यादीवरुन चार गायी अंदाजे किंमत 50 हजार, एक टेम्पो तीन लाख व दुचाकी 19 हजार असा पावणेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करुन नायगाव पोलिसांच्या स्वाधीन केला. वरील तिन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एक आरोपी अहमद कुरेशी घटनास्थळावरुनच पळून गेल्याने इसाख कुरेशी व बाबा कुरेशी यांना ताब्यात घेतले आहे. तपास मांजरम पोलिस चौकीचे पोलिस हवालदार शेख करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT