There is only one rural hospital in Umari city.jpg 
नांदेड

 नांदेड : उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात एकच वैद्यकीय अधिकारी

प्रल्हाद हिवराळे

उमरी (नांदेड) : तालुक्यात ५८ ग्राम पंचायत असून गाव व वाडी तांडे मिळून एकूण ६२ गावे आहेत. या गावातील महिलांच्या सुरक्षेसाठी उमरी शहरात एकच ग्रामीण रुग्णालय आहे. या ग्रामीण रुग्णालयात दोन बालरोगतज्ज्ञ डॉक्टर तर एक पुरूष डॉक्टर सध्या कार्यरत असून या ठिकाणी वैद्यकीय अधिक्षकांची व तीन वैद्यकीय अधिकारी यांच्या जागा रिक्त आहेत. 

शहरातून व ग्रामीण भागातून महिला रुग्णांची संख्या वरचेवर वाढत असून उमरी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ महिला डाँक्टरांची नितांत आवश्यकता असल्याने महिला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा सचिव प्रेमलता अग्रवाल, तालुकाध्यक्षा प्रणिता शरद जोशी, शहराध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा अनिता श्रीनिवास अनंतवार यांनी वरिष्ठाकडे तोंडी स्वरूपात तक्रार केली आहे. 

तालुक्यात एकूण ६२ गावे येतात. तालुक्याची ठिकाणी ग्रामीण रूग्णालय असून या ठिकाणी बालरोगतज्ञ डॉ. अषिश कदम, डॉ. चंदापुरे असे दोन डॉक्टर आहेत. तर स्त्रीरोगतज्ञ डॉ. शंकर चव्हाण एकच डॉक्टर आहेत. तालुक्यातील ६२ गावे असल्याने प्रभारी वैद्यकिय अधिक्षक पद हे सध्याला डॉ. शंकर चव्हाण यांना देण्यात आले आहे.

यापूर्वी उमरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. सारिका काकाणी, डॉ. मोहिनी भोसीकर, डॉ. वैशाली ढगे, डॉ. सई सिरडकर, डॉ. सविता कांबळे, डॉ. रसिका कुलकर्णी, डॉ. प्रिती दर्डा, डॉ. ज्योती उत्तरवार, डॉ. माने यांनी ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी उपलब्ध होत्या. यांच्यानंतर एकही महिला डॉक्टर उमरी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ पद भरले नाहीत.

ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी कुठलीच सोय नसल्याने खासगी दवाखान्यात नाईलाजास्तव महिला जात असतात. त्यात आर्थिक झळही नातेवाईकांना सोसावे लागत आहे. 

पुर्वी उमरी ग्रामीण रुग्णालयात याच ठिकाणी महिला डॉक्टर असल्याने मोठ्या प्रमाणात नॉर्मल डिलिव्हरी होत होत्या. महिला डॉक्टर नसल्याने ग्रामीण भागातील महिलांची कोंडी होत आहे. उमरी ग्रामीण रुग्णालयात सर्व सुख सुविधा दिल्यास आणी पूर्ण वेळ स्त्रीरोगतज्ज्ञ महिला डॉक्टर दिल्यास कुचंबना होत नाही, असे शहरी व ग्रामीण महिलांचे मत आहे. म्हणून या भागाचे आमदार राजेश पवार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लक्ष घालून महिला डॉक्टर व महिलांच्या सुरक्षेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव प्रेमलता आग्रवाल, प्रणिता शरद जोशी, शहराध्यक्षा अनिता श्रीनिवासन अनंतराव यांनी केली आहे. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded DCC Bank: अर्धापूर सेवा सोसायटी गटात पंचरंगी लढत; भाजपच्या तिघांसह पाच उमेदवार रिंगणात, भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये लढत

Pune Ambedkar Hostel Grant: आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा; भोजन अनुदानात २१५० वरून ३२०० रुपयांपर्यंत वाढ

Junnar Civic Row: जुन्नर नगरपरिषदेतील कलह शिगेला; नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात सत्ताधारी-विरोधकांची सर्वसाधारण सभेला दांडी

Pune Zilla Panchayat Samiti Association: पुणे जिल्हा तालुका पंचायत सभापती असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर

Crime: टीसी घ्यायला आला, पण हातात होता चाकू... शिक्षकावर विद्यार्थ्याचा जीवघेणा हल्ला, भयंकर कारण समोर

SCROLL FOR NEXT