लग्न समारंभ.jpg 
नांदेड

लग्न समारंभासाठी अशा आहेत अटी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत लग्नसमारंभाच्या परवानगीबाबत विचारणा होत असून याअनुषंगाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत लग्न समारंभासाठी प्रमाणीत कार्यप्रणाली जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेशाद्वारे ता. १३ मे रोजी निश्चित केली आहे.  

वीस पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नको
नांदेड जिल्ह्यात सर्व जाती-धर्माच्या लग्न समारंभास सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील नमूद अधिसूचना व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना विचारात घेता लग्न समारंभाच्या ठिकाणी वीस व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत. लग्नाच्या ठिकाणी सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे नियम पाळणे, हॅन्डवॉश, सॅनिटायजर्सचा वापर करणे, लग्नाचा विधी संपल्यानंतर सर्व वस्तू तसेच ठिकाण निर्जतूकीकरण करणे गरजेचे आहे.

अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक
या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली प्रमाणीत कार्यप्रणाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील नमूद अटी व शर्ती यांचे पालन करणे बंधनकारक आहे. या अटीवर नांदेड जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रासाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच यावेळेत वर-वधुच्या निजी निवासस्थानी किंवा संबंधिताचे नातेवाईक यांच्या निजी जागेतच लग्न समारंभास मुभा देण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाइ
असे लग्न समारंभाच्या अनुषंगाने लग्नाचा दिनांक, स्थळ, वेळ इत्यादी बाबत पूर्व माहिती संबंधितांनी लगतच्या पोलीस स्टेशन, स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे आवश्यक आहे. या आदेशाची संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित पोलीस निरीक्षक यांनी अंमलबजावणीची वेळोवेळी खात्री करावी. तसेच जे कोणी व्यक्ती, समुह या आदेशाचे उल्लंघन करील त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Plastic Scrap Fire: प्लास्टिकच्या साठ्याला हवा नियमांचा अंकुश अग्निप्रतिबंधक, प्रदूषण नियंत्रण परवानगी सक्तीची करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT