file photo 
नांदेड

किनवट तालुक्यातील या गावांचा जन- वन विकास योजनेत समावेश

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात किनवट व माहूर तालुक्यात वनक्षेत्र अधिक असल्याने या भागातील अनेक गावांचा विकास झाला नाही. या गावांचा विकास व्हावा व जंगल व गावकऱ्यांना रोजगार मिळावा यासाठी शासनाकडून डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी जन- वन विकास योजना सुरु केली. या योजनेंतर्गत किनवट तालुक्यातील चार गावांची निवड करण्यात आली. त्यामुळे या चार गावांचा विकास होणार यात शंका नाही. 

वनक्षेत्रात असलेल्या गावांचा विकास व्हावा, येथील ग्रामस्थांचे वन क्षेत्रावरील अवलंबित्व कमी व्हावे, ग्रामस्थ आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष होऊ नये या दृष्टीने गावांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना तयार केली आहे. आता या योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातील बोथी, परसराम नाईक तांडा, उनकेश्वर आणि उमरी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. शेतीला जोड धंदे उभारुन या गावातील ग्रामस्थांचे वनक्षेत्रावरील अवलंबित्व कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आदिवासी वाडी, तांड्यातील बहुतांश ग्रामस्थांचा रोजगार शेती आणि वनक्षेत्रावर अवलंबून असतो. तेंदूपत्ता, डिंक व वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा संग्रह करुन त्यावर त्यांची रोजीरोटी चालते. हंगामानुसार महसूल जमा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे वारंवार त्यांचा वन्यप्राण्यांचा सामना होतो. यात कधी वन्यप्राण्यांची हाणी होते तर कधी मानवाला त्याची किंमत मोजावी लागते. अलीकडील काही वर्षांत असे प्रकार जास्त प्रमाणात घडू लागले आहेत.

जिल्ह्यालगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या वनक्षेत्रात नेहमी हे प्रकार होत असतात. पांढरकवडा आणि नांदेडचे वनक्षेत्र परस्परांना लागून आहे. कधी तिकडून वन्यप्राणी इकडे येतात तर कधी येथील वन्यप्राणी तिकडे संचार करतात. या एकंदर परिस्थितीचा विचार करुन या दोन्ही वनक्षेत्राला पूरक असावी अशी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किनवट या जंगल परिसरात असलेल्या चार गावांना त्याचा फायदा होणार आहे. या गावातील शेतीला जोडधंदा निर्माण करुन ग्रामस्थांना उपजीविकेची नवी साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येथील ग्रामस्थांना गावातच रोजगार मिळाल्यावर ते जंगलावर अवलंबून राहणार नाहीत. त्यामुळे गावाचा आणि वनाचाही विकास होईल असे उद्दिष्ट आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT