file photo 
नांदेड

नांदेडच्या सांगवीमध्ये चोरट्यांनी चार दुकाने फोडले; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

प्रमोद चौधरी

नांदेड : शहरातील सांगवी टी पॉइंट परिसरात असलेल्या कॉम्प्लेक्समधील मोबाईल शॉपी, इलेक्र्टॉनिक व इतर असे एकूण चार दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. गुरुवारी (ता. चार) पहाटे ही घटना उघडकीस आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी माहिती दिली.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सांगवी टी पॉइंटजवळ आसनाकडे जाताना उजव्या बाजूच्या कॉम्पलेक्समध्ये गुरुवारी (ता. चार) पहाटे अज्ञात चोरट्यांनी एक मोबाईल शॉपी, इलेक्ट्रॉनिक दुकान, दवाखाना व एका खासगी शाळेच्या कार्यालयाचे शटर तोडून त्यातील लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. 
 
घटनेची माहिती मिळताच श्वान पथकाला आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फिंगरप्रींट पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. शिवाय विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. एकंदरीतच शहरात दिवसाढवळ्या होत असलेली लुटमार, चोरी व इतर गुन्ह्यांमुळे नागरिक हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांची शहराच्या विविध भागांमध्ये रात्रीची गस्त सुरु असतानांही चोरट्यांचा धुमाकुळ मात्र कमी झालेला दिसत नाही. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी या बाबीकडे लक्ष घालुन शहरातील रात्रीची पोलिस गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

व्यापाऱ्यांमध्ये घबराट
पोलिसांसह फिंगरप्रिंट तज्ज्ञ तसेच श्वान पथकाने सकाळी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना त्यात यश आले नाही. या घटनेत किती रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला, याची माहिती रात्री उशीरापर्यंत समजू शकली नाही. दरम्यान एकाच रात्री चोरट्यांनी चार ठिकाणी डल्ला मारल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT