Nanded News sakal
नांदेड

Nanded News : मुदखेडमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले;घटना सीसीटीव्हीत कैद,१९ लाखांना गंडा

शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे अख्खे एटीएम मशीनच चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली. त्यात १९ लाख १४ हजार रुपयांची रोकड होती.

सकाळ वृत्तसेवा

मुदखेड : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे अख्खे एटीएम मशीनच चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली. त्यात १९ लाख १४ हजार रुपयांची रोकड होती. रविवारी मध्यरात्री २ वाजून १५ मिनिटांनी तीन-चार चोरट्यांनी एटीएम मशीन पळविल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतील एटीएम मशीनमध्ये शुक्रवारी वीस लाख रुपये जमा करण्यात आले होते. मशीन चोरी होताना त्यात एकोणीस लाख चौदा हजार पाचशे रुपये शिल्लक असल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांनी दिली.

चोरट्यांनी वापरलेले साहित्य जागेवरच ठेवून एटीएम उचलून नेले. श्वान पथक, गुन्हे शाखेचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले होते. आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता यामध्ये अशोक लिलँड कंपनीची पिकअप गाडी यावेळेत एटीएमजवळ उभी असून तीन ते चार जण याठिकाणी असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसतात. यानंतर पथकाने गावातील आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT