File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी तीन बाधितांचा मृत्यू, ४९ अहवाल पॉझिटिव्ह

प्रमोद चौधरी

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमीजास्त होताना दिसत आहे. मंगळवारी (ता. आठ) कोरोना अहवालानुसार ४९ जण पॉझिटिव्ह तर ३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज तीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यू संख्या ५५४ इतकी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.

मंगळवारी (ता. आठ) प्राप्त झालेल्या ९३० अहवालांपैकी ८७९ निगेटिव्ह, ४९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २० हजार ६७५ एवढी झाली आहे. यातील १९ हजार ५७६ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. रुग्णालयात औषधोपचार सुरु असलेल्या बाधितांपैकी १९ रुग्णांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

मंगळवारी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या सोमठाना (ता.उमरी) येथील २९ वर्षीय महिलेचा, जिल्हा रुग्णालयात स्नेहनगरनगर नांदेड येथील ७० वर्षिय महिलेचा तर खासगी रुग्णालयात कुंटुर (ता.नायगाव) येथील ८० वर्षिय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ५५४ इतकी कोरोना बाधीत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या झाली आहे.  

बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय - पाच, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण - १४, किनवट कोविड रुग्णालय - तीन, खासगी रुग्णालय - आठ, लोहा -दोन, मुखेड - दोन आणि धर्माबाद - तीन असे एकूण ३७ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.   

मंगळवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात ३२, कंधार - एक, नायगाव - दोन, मुदखेड - एक, माहूर - एक, देगलूर - तीन, लोहा - एक, मुखेड - सहा, हदगाव - एक आणि परभणी- एक असे एकूण ४९ बाधित आढळले. जिल्ह्यात ३५० बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १६, जिल्हा रुग्णालय २९, जिल्हा रुग्णालय नवी इमारत ३२, मुखेड २४, किनवट दोन, भोकर - दोन, हदगाव दोन, देगलूर दोन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ६४, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १५१, खासगी रुग्णालयात २६ असे एकूण ३५० बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत.  
 
कोरोना मीटर ः 

  • मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ४९
  • मंगळवारी कोरोनामुक्त - ३७
  • मंगळवारी मृत्यू- ०३
  • एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २० हजार ६७५ 
  • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १९ हजार ५७६
  • एकूण मृत्यू संख्या- ५५४
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ४०४
  • अतिगंभीर रुग्ण - १९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT