file photo 
नांदेड

नांदेडला तिघांचा मृत्यू; ५८ पॉझिटिव्ह तर ५२ कोरोनामुक्त

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून शनिवारी (ता. १२) सायंकाळी आलेल्या अहवालात ५८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचबरोबर दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२४ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील १८ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. दरम्यान, ५२ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. शनिवारी (ता. १२) प्राप्त झालेल्या नऊशे अहवालांपैकी ८३१ निगेटिव्ह तर ५८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २० हजार ८२९ झाली आहे. दरम्यान, बोधडी (ता. किनवट) येथील पुरूष (वय ७०), वाई बाजार (ता. माहूर) येथील पुरूष (वय ४०) आणि यशवंतनगर नांदेड येथील पुरुष (वय ८३) या तिघांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची संख्या ५५९ झाली आहे. 

१८ जणांची प्रकृती अतिगंभीर 
शनिवारी दिवसभरात उपचार सुरु असलेल्या ५२ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १९ हजार ७५१ झाली आहे. सध्या सध्या ३२४ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील १८ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात १६९ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे ६७ खाटा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी दोन, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण दहा, किनवट कोविड रुग्णालय चार, भोकर कोविड रुग्णालय दहा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड सात, मुखेड कोविड रुग्णालय १४, खासगी रुग्णालय पाच असे एकूण ५२ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.८२ टक्के आहे. 

३२४ रुग्णांवर उपचार सुरू 
शनिवारी ५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात नांदेड महापालिका क्षेत्रातील ३०, नांदेड ग्रामिण दोन, लोहा - एक, भोकर - पाच, हदगाव - एक, माहूर - सात, नायगाव - एक, अर्धापूर - एक, देगलूर - चार, मुखेड - दोन, किनवट - एक, हिंगोली - एक, परभणी - एक यांचा समावेश आहे. तसेच ३२४ रुग्णांवर उपचार सुरु असून त्यात विष्णुपुरी रुग्णालयात २६, जिल्हा रुग्णालयात - ३०, जिल्हा रुग्णालय नवीन इमारतीत - १९, मुखेड कोविड रुग्णालयात सहा, देगलूरला पाच, हदगावला - सहा, किनवटला तीन, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरणात - १७८, नांदेड जिल्ह्यातील गृह विलगीकरणात ३२, खासगी रुग्णालयात १९ जणांचा समावेश आहे. 

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण स्वॅब - एक लाख ६३ हजार २९
  • निगेटिव्ह स्वॅब - एक लाख ३८ हजार २०५
  • एकूण पॉझिटिव्ह - २० हजार ८२९
  • एकूण बरे - १९ हजार ७५१
  • एकूण मृत्यू - ५५९
  • शनिवारी पॉझिटिव्ह - ५८
  • शनिवारी बरे - ५२
  • शनिवारी मृत्यू - तीन
  • सध्या उपचार सुरू - ३२४
  • अतिगंभीर असलेले - १८
  • प्रलंबित स्वॅब - ४३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT