Three two-wheelers collided head-on on the Kinwat Mahur Highway on Tuesday 
नांदेड

तीन दुचाकींचा समोरासमोर विचित्र अपघात; एक ठार दोन जखमी

मिलिंद सर्पे

किनवट (नांदेड) : तीन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या विचित्र अपघातात एक ठार, एक गंभीर तर एक जखमी झाला. हा अपघात आज (ता.२४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास किनवट-माहूर महामार्गावर शांतीभूमी बौध्द स्मशानभूमी जवळ झाला.

याबाबतची अधिक माहिती, शहरातील रंगवैभव कलेक्शन या कापड दुकानात काम करणारा लोणी (ता. किनवट) येथील निखिल ब्रम्हाजी गुंजकर (वय २४) हा एम.एच. २६ - बी.के. २४४८ क्रमांकाच्या दुचाकीवरून शेतातून डबलसीट किनवटकडे येत होता. तर टी. एस. ०१ - एफ. ए. २२०९ क्रमांकाची दुचाकी किनवटहून बाहेर जात होती. तीसरी दुचाकी साठेनगरातून किनवट - माहूर महामार्गावर येत होती.

या तीनही गाड्यांची विचित्र टक्कर झाली. या अपघातात निखिल गुंजकर हा तरुण जागीच ठार झाला. तर रुद्राक्ष शंकर जल्लावार (वय २२) रा.साठेनगर, किनवट याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला मोठी जखम झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. समोरुन येणा-या तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील इच्चोडा मंडळातील आडेगांव येथील चिटफंडचा कर्मचारी बलविरसिंग ठाकूर (वय ४०) हा किरकोळ जखमी झाला आहे. या घाईगर्दीत तिस-या दुचाकीस्वाराने पोबारा केल्याचे बघ्यांनी सांगितले आहे.

जखमींवर येथील सानेगुरुजी रुग्णालयात डॉ.अशोक बेलखोडे यांनी उपचार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुरली राठोड, पोहेकाँ. आप्पाराव राठोड, पो.ना. एलकधरे, पोकॉ. ज्ञानेश्वर डुकरे यांनी जाऊन घटनेचा पंचनामा केला. रुद्राक्ष जल्लावार गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी आदिलाबाद किंवा नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्याच्या हालचाली सुरु होत्या. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT