File photo 
नांदेड

फुले विक्रेत्यांवर इतर व्यवसाय करण्याची वेळ, कशामुळे? ते वाचाच  

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : केंद्राने मंदिरांसह सर्व व्यवहार सुरु करण्याचे जाहीर केले तरी, महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने अद्यापही बंदच आहेत. त्याचा परिणाम फुलविक्रेत्यांवर होताना दिसत आहे. उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याकरिता लागू झालेल्या लाॅकडाउन व संचारबंदीमुळे धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. केवळ पुजाऱ्यांना पूजा करण्यापुरती मास्क लावून व फिजिकल डिस्टन्स पाळून मुभा देण्यात आलेली आहे. सामान्य भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने फूल विक्रेत्यांचा रोजगार गेला असून आता ते उदरनर्वाहासाठी चक्क भाजीपाला, फळे विक्री करताना दिसत आहेत. 

देवाधिकांना मानणारा व भक्ती करणारा वर्ग संख्येने मोठा आहे. प्रत्येक देव देवतांचे वार ठरले आहेत. त्यादिवशी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी राहते. श्रद्धा व भक्तीचा पगडा मोठा असल्याने फुलविक्रेत्यांना रोजगार उपलब्ध झाला होता. विशेष म्हणजे फुलशेतीलाही त्यामुळे चालना मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक न घेता नगदी पीक म्हणून फुलशेती करण्याकडे आपला कल वाढवला. त्यामुळे  फुलविक्रीचा मोठा व्यवसाय निर्माण झाला. फुलविक्रीचा किरकोळ व्यवसाय करणाऱ्या एका विक्रेत्याची या माध्यमातून दररोज पाचशे रुपयांपर्यंत मिळकत होती. त्यावर त्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत होता. अनेकांनी या व्यवसायासाठी कर्जही घेतले. त्याचे हप्तेही ते फेडू लागले होते.

कोरोनाने विस्कटली घडी
कोरोनाच्या आक्रमणाने फुलांच्या व्यवसायातून बसवलेली ही घडी विस्कटली. विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मंदिर बंद करण्यात आलीत. यामागे गर्दी टाळणे हा मुख्य उद्देश होता. भाविकांना मंदिरातील प्रवेश बंद करण्यात आला. केवळ पुजारी व मोजके दोन चार विश्वस्त यांनाच पूजा करण्यापुरती मुभा देण्यात आली. याचा परिणाम थेट किरकोळ फूल विक्रेत्यांवर पडला. भाविकच येत नसल्याने त्यांचा व्यवसायच बंद पडला. रोजची मिळकत बंद झाली. कुटूंबाचा गाडा ओढायचा तर व्यवसाय करावा लागणारच असल्याचे बालाजी कोरकुमवार यांनी सांगितले.    

कुटुंबासाठी करावे लागते
शहरातील मोठ्या व प्रसिद्ध मंदिराबाहेर छोटे दुकान थाटून फुलविक्री करीत होतो. मंदिर आता बंद असल्याने रोजगार बुडाला आहे. कुटुंबाचा गाडा चालविण्याकरिता मिळेल तो धंदा करावा लागत आहे. 
- बलाजी कोरकुमवार (किरकोळ फुल विक्रेता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; अडीच ते तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा, ट्रेलर बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

२४ तास तुरुंगात राहिल्यानंतर कसं वाटलं? अभिजीत दीपकेंनी शेअर केला शाहरुख खानच्या चित्रपटातील सीन

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT