file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात आजपासून ता. चार एप्रिलपर्यंत संचारबंदी 

अभय कुळकजाईकर

नांदेड - शहर आणि जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी (ता. २४) मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून ती ता. चार एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. संचारबंदीचे नियम पाळून प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीच्या नियमाचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

नांदेड शहर आणि जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका आणि जिल्ह्यात सर्व पातळीवर प्रयत्नांची शर्त केली जात असून जनतेनेही तेवढ्याच जबाबदारीने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. हा लढा सर्वांच्या मुक्तीचा असून सर्वांनी एकत्रीत आपले कर्तव्य व काळजी घेतली तर जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाला आपण यशस्वीपणे नियंत्रणात आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू 
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात ता. २५ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते ता. आठ एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना 
संचारबंदी नियम पाळून प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. कुलदिपक अंकुशे (९८५०९७८०३६), शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसार अली (९३२५६०७०९९), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी डॉ. वाय. एच. चव्हाण (९९७००५४४३४) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हे राहणार बंद  

  • हॉटेल्स, उपहारगृह, बार तसेच सार्वजनिक कार्यक्रम. 
  • जिल्हातंर्गत बससेवा बंद, लांब पल्ल्याच्या सुरू 
  • मटन, चिकन, अंडी व मासे विक्री 
  • सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने 
  • सर्व प्रकारचे बांधकाम व कंन्स्ट्रक्शनची कामे 
  • चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, रिसॉर्ट, मॉल, आठवडी बाजार 
  • सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रम 
  • सलुन व ब्युटी पार्लरची दुकाने 
  • मोकळ्या जागेत, उद्यानांमध्ये फिरणे. 
  • सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉक 
  • शाळा, महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग बंद 

यांना आहे सवलत 

  • किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील. 
  • दुध विक्री व वितरण सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. 
  • भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी सात ते १० या वेळेतच करता येईल. 
  • खासगी व सार्वजनिक वैद्यकिय सेवा सुरु राहतील. 
  • पेट्रोल पंप व गॅस वितरण सेवा सुरु राहणार. 
  • वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेतच वर्तमानपत्रांचे वितरण करता येईल. 
  • पाणी पुरवठा (जार, टॅंकर) दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. 
  • स्वस्त धान्य दुकाने सुरु राहतील. 
  • अंत्यविधीसाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी. 
  • औषध विक्रीचे दुकाने २४ तास सुरु राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT