वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : मागील अनेक महिन्यांपासून वाई बाजार (Wai bajar mahur) येथे सर्वच मोबाईल कंपन्यांचे (Mobile compony not internet conection) नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी नागरिक आपला मोबाईल नंबर पोर्ट करत आहे. परंतु ज्या कंपनीकडे नंबर पोर्ट केलाय. त्या देखील मोबाईल कंपनीचा नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक व्यापारी व शाळकरी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. संबंधित मोबाइल कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी वाई बाजार परिसरातील मोबाईल ग्राहक करत आहेत. (tower- has- a- name- no- range- to the- village- Mobile -holders- suffer)
वाई बाजार येथे बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्क मनोऱ्यावर जियो, ओडाफोनच्या छत्र्या आहेत. तर आयडियाने आपले स्वतंत्र टावर उभारलेले आहे. जिओची मोबाइल नेटवर्किंग थोडीफार ठीक आहे. परंतु बीएसएनएलने तर जणू इतर मोबाईल कंपन्यांकडून चिरीमिरीचे संबंध प्रस्थापित केले की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे. चार महिन्यापूर्वी बीएसएनएलची उत्कृष्ट मोबाईल सेवा मिळत असल्याने व चांगली इंटरनेट सर्व्हिस मिळत असल्याने अधिकांश लोकांनी बीएसएनएलचे नवीन सिमकार्ड घेतले तर काहींनी आपले आयडिया, वडाफोन, जिओचे नंबर बीएसएनएलमध्ये परिवर्तित करून घेतले. परंतु मागील दोन महिन्यापासून बीएसएनएलने ग्राहकांचे वांधे करून ठेवले आहे. मोबाईल ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी या हेतूने ठीक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले.
हेही वाचा - विद्यार्थी-पालकांचा संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण विभागानेच उचलली पावले
गडगंज पगारी वर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु हे अधिकारी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्यातरी मोबाईल टॉवर्स शोभेची वस्तू बनले आहे. ग्राहकांची तक्रार किंवा फोनवर सूचना दिली तर त्यांची साधी दखलही घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. आज घडीला मोबाईल कंपन्यांच्या भरोशावर स्थानिक बँक, सेमी गव्हर्मेंटची कार्यालय व हजारोच्या संख्येत असलेले मोबाईल धारक अवलंबून आहेत. परंतु याच मोबाईल कंपन्याकडून नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक वेळा बँकांमधील व्यवहाराला खोळंबा निर्माण झाला आहे.
याबाबत संबंधित मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना अत्यावश्यक व व्यवस्थित सुविधा मिळावी यासाठी तातडीने उपाय योजना करुन बीएसएनएल सहित इतर सर्वच मोबाइल कंपन्यांनी वाई बाजारसह माहूर तालुक्यातील सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क अविरत मिळेल अशी सेवा देण्याची आग्रही मागणी केली जात आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.