तामसा पूल पहिल्याच पावसात तुटला 
नांदेड

पाथरड पूलाच्या पडझडीची परंपरा कायम; नविन पूलाला मुहूर्त कधी ?

आठवड्यापूर्वी तामसा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर येऊन पाथरड नदीच्या पूलाचा दरवर्षी वाहून जाणारा भाग यावेळीही वाहून गेला.

शशिकांत धानोरकर

तामसा ( जिल्हा नांदेड ) : पाथरड नदीवरील नळकांडी पूलाचा मोठा भाग पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नदीला आलेल्या पुराच्या तडाख्यात वाहून गेला असून पावसाळ्यात पुलाची पडझड होण्याची परंपरा याही वर्षी कायम आहे. दरवर्षी पुराने पुलाचे नुकसान होणे व पुन्हा तात्पुरती डागडुजी करुन पूल वापरतात येणे, हा प्रकार चालूच आहे.

आठवड्यापूर्वी तामसा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर येऊन पाथरड नदीच्या पूलाचा दरवर्षी वाहून जाणारा भाग यावेळीही वाहून गेला. त्यामुळे आता हा पूल धोकादायक अवस्थेत असून पुलाचा उर्वरित भाग पुराच्या तडाख्याने कधी वाहून जाईल याचा नेम नाही. हा पूल कालबाह्य झाला असून त्याची नव्याने निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे. धोकादायक अवस्थेतील या पूलांमध्ये बोरवेलचे मोठे वाहन पडून दोन परप्रांतीय मजूर दगावले होते. पूलाच्या दुरवस्थेमुळे वाहने, बैलगाडी, जनावरे, नागरिक पडणे अशा दुर्देवी घटना मोठ्या प्रमाणात येथे घडल्या आहेत.

हेही वाचा - वाचा काय आहे नेमकं कारण?

पाथरड गावाचा नवीन वस्ती, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य उपकेंद्र, पशु उपकेंद्र, तामसा यांच्याशी संपर्क जोडणारा हा एकमेव पूल आहे. कमी उंचीच्या या पुलावरुन पुराचे पाणी वाहतांना दिवसभर गावाचा संपर्क तुटला जातो. यामुळे स्थानिकांना मोठा त्रास दर पावसाळ्यात दुर्देवाने सहन करावा लागतो. या पूलाची उंची वाढवून नवीन निर्मिती करण्याची स्थानिकांची मागणी अनेक वर्षापासून आहे.

पण या मागणीला अद्यापही यश मिळाले नसून दरवर्षी पडझड झालेल्या पूलाच्या भागांची डागडुजी केली जाते. दरवर्षी डागडुजीवर खर्च ना पूलाच्या कामाचा, ना ग्रामस्थांच्या उपयोगाचा ठरत आहे. त्यामुळे पाथरड नदीवर नवा व उंच पूल उभारणे हे आत्ता ग्रामस्थांना दरवर्षीच्या त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी आवश्यक आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ६ मोठे निर्णय, वाचा...

Mumbai: यंदा रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही, महापालिकेचा मोठा प्लॅन तयार; नेमकी योजना काय?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : मिरा-भाईंदरमधील वाढत्या पाणीटंचाईमुळे मनसेचे अनोखे आंदोलन

YouTube Growth Tips: यूट्यूबवर सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कसे कमवायचे? कंपनीने स्वतःच सांगितली भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT