file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात २८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू 

शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होईल, असा अंदाज यापूर्वीच तज्ज्ञांनी वर्तविला होता. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. बुधवारी (ता. ११) प्राप्त झालेल्या अहवालात एका बाधिताचा मृत्यू झाला तर ७३ जणांची कोरोनावर मात केली. या सोबतच २८ बाधितांची भर पडली आहे.
 
नांदेडला बुधवारी एक हजार १२२ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ८६ निगेटिव्ह आले तर २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १९ हजार ५४० वर पोहचली आहे. दिवसभरात विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील - पाच, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील - सहा, एनआरआय भवन आणि गृह विलगीकरण कक्षातील २४, हिमायतनगर - तीन, किनवट - सहा, देगलूर - एक, मुखेड - दोन, कंधार - एक, हदगाव - एक आणि खासगी रुग्णालयातील २४ असे ७३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

एकाचा उपचारादरम्यान मृत्यू 
जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ५४७ इतक्या बाधितांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या देगलूर येथील एका ७० वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या ५३४ वर पोहचली आहे. 

नव्याने २८ कोरोनाबाधित 
बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - १७, नांदेड ग्रामीण - एक, लोहा - एक, मुदखेड - एक, देगलूर - एक, अर्धापूर - एक, देगलूर - एक, भोकर - दोन, धर्माबाद - दोन, नागपूर - एक असे २८ कोरोना बाधित नव्याने आढळुन आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १९ हजार ५४० इतकी झाली आहे. त्यापैकी १८ हजार ५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर ५३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या २८४ बाधितांवर उपचार सुरु आहेत. यामधील १५ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ३५४ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

हेही वाचलेच पाहिजे - माहूरजवळ एसटी बस व ट्रकचा अपघात ; ४३ प्रवासी जखमी

नांदेड कोरोना मीटर 

  • एकूण पॉझिटिव्ह - १९ हजार ५४०
  • बुधवारी पॉझिटिव्ह - २८ 
  • एकूण कोरोनामुक्त - १८ हजार ५४७
  • बुधवारी कोरोनामुक्त - ७३ 
  • एकूण मृत्यू - ५३४ 
  • बुधवारी मृत्यू - एक 
  • उपचार सुरु - २८४ 
  • गंभीर रुग्ण - १५ 
  • स्वॅब प्रलंबित - ३५४ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT