हळद बाजारपेठ नवा मोंढा नांदेड 
नांदेड

हळद चुकारे वेळेत मिळेनात; अडत्यासह खरेदीदारांकडून दिड महिन्याचा अवधी

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवा मोंढा बाजारात शेतकर्‍यांची हळद मोठ्या प्रमाणात येते. महाराष्ट्रातील निवडक हळद बाजारांमध्ये नांदेड बाजार बाजाराचा समावेश आहे.

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवा मोंढा बाजारात शेतकर्‍यांना हळदीचे चुकारे एक ते दीड महिन्यापर्यंत मिळत नाहीत. यामुळे शेतकर्‍यांना शेतकर्‍यांना माल देवूनही अडत्यांच्या हाताकडे बघण्याची वेळ आली आहे.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवा मोंढा बाजारात शेतकर्‍यांची हळद मोठ्या प्रमाणात येते. महाराष्ट्रातील निवडक हळद बाजारांमध्ये नांदेड बाजार बाजाराचा समावेश आहे. सध्या नव्या हळदीची आवक सुरू आहे. दर महिन्याला ३५ ते ४० हजार क्विंटल हळदीची आवक सध्या नांदेड बाजार समितीमध्ये होत आहे. यात हळदीचा २५ ते ३० कोटी रुपयांचा शेतीमाल दर महिन्याला विक्री होतो. हळद विक्री झाल्यानंतर लगेच पैसे देणे अपेक्षित असते.

हेही वाचा - सर्वाधिक तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या गडचिरोलीतील बेरोजगारांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत नक्षलवाद फोफावतो आहे

परंतु येथील बाजारात शेतकर्‍यांना हळदीची विक्री झाल्यानंतर एक ते दीड महिने पैशासाठी वाट पहावी लागत आहे. ज्या शेतकर्‍यांना नगदी पैसे हवे असतील त्यांना हळदीच्या दरातून तीन टक्के रक्कम कपात केली जाते, अशी माहिती मिळाली. तर आरत्यांनाही खरेदीदाराकडन एक टक्के रक्कम कमी दिली जाते. सध्या पेरणीच्या तोंडावर शेतकर्‍यांना हळदीचे पेसे मिळत नसल्याने त्यांना व्यापार्‍याकडे जावे लागत आहे. हळदीच्या पेशाबाबत नांदेड बाजार समितीच्या संचालक मंडळाने लक्ष देवून शेतकर्‍याचा माल विक्री होताच त्यांना तत्काळ पैसे मिळतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हळद विक्री झाल्यानंतर शेतकर्‍यांना तत्काळ पेसे देण्याची तंबी अडत्यांसह खेरदीदारांना दिली आहे. यामुळे खरेदीदारांनी २१ दिवसात शेतकर्‍यांना पेसे देण्याचे मान्य केले आहे.

- संभाजी पाटील, सभापती, नांदेड बाजार समिती, नांदेड.

नवा मोंढा बाजारात हळद विक्री केलेल्या शेतकर्‍यांना दिड महिन्यसापर्यत पैसे मिळत नाहीत. याची जबाबदारी जबाबदारी संचालक मंडळाची आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

- प्रल्हाद इंगोले, शेतकरी नेते, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT