turmeric  Sakal
नांदेड

Nanded News : नांदेड बाजार समितीत हळदीचे दर १५ हजारांवर स्थिरावले; आवक घटल्याचा परिणाम

हळदीला प्रतिक्विंटल ८ हजार १०० रुपये तर, सरासरी सहा हजार ७०० ते सहा हजार ८०० रुपये इतका मिळाला होता.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील काही दिवसांपासून हळदीचे दर १५ हजार क्विंटलावर स्थिरावले आहे. सध्या आवकही घटली असून त्याचा परिणाम झाला आहे.

दरम्यान, बुधवारी (ता.१९) कमाल १५ हजार ९८५, कमाल १३ हजार व सरासरी १५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलाला दर मिळाला. तसेच हळदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, संभाजीनगर, यवतमाळ, धाराशिव या भागातूनही हळद उत्पादक आपला माल विक्रीसाठी नांदेड येथील बाजारपेठेत आणतात. बाजार समितीत नेहमी दहा ते बारा हजारे हळदीचे कट्टे दाखल होतात.

त्यांची एकाच दिवशी मोजणीही करण्यात येते. गतवर्षी एप्रिलमध्ये काढणीच्या वेळी पाऊस आल्याने हळद भिजल्या गेली. त्यामुळे सुरवातीला ५ हजार रुपये क्विंटलाला दर मिळाला होता. पुढे मे महिन्यात हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली होती.

हळदीला प्रतिक्विंटल ८ हजार १०० रुपये तर, सरासरी सहा हजार ७०० ते सहा हजार ८०० रुपये इतका मिळाला होता. पुढे हा दर थोड्या फारकाने कमी जास्त होत १९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेला आहे.

यंदा मात्र, सुरुवातीपासूनच हळदीला चांगला दर मिळाला आहे. मागील महिन्यापर्यंत ३ ते ४ हजार हळदीचे कट्टे (गोणे) विक्रीसाठी येत होते. सध्या १८ गोणे येत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी मार्च, एप्रिलमध्येच हळदीची विक्री केली होती.

त्यामुळे फार कमी शेतकऱ्यांकडे माल शिल्लक आहे. त्यामुळे अशा परिस्थ‍ितीत आणखी दर वाढण्याची शक्यता असते. मागील वर्षी याच दिवसात हळदीला २७ हजार ५०० रुपये क्विंटलाला दर मिळाला होता. परंतु, त्यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक नव्हती.

तुरीच्या दरात चढ-उतार

यंदा तुरीचे उत्पादन कमी झाल्याने चांगला दर मिळाला आहे. मागील आठवड्यात १२ जूनला तुरीला कमाल ११ हजार २००, किमान ९ हजार ९५, सरासरी १० हजार ४०० रुपये क्विंटलाला दर मिळाला आहे. या आठ दिवसांत यात दरामध्ये एक हजार रुपयांनी चढ-उतार झाला आहे. बुधवारी (ता.१९) कमाल ९ हजार ८००, किमान ८ हजार ९०० व सरासरी ९ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT