file photo 
नांदेड

नांदेडला हळदीच्या दरात तेजी; कमाल दर पंधरा हजारावर : आवक घटल्याचा परिणाम

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या हळदीची आवक घटल्याने दरात सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात एक मार्चला कमाल दर पंधरा हजार, किमान सात हजार सातशे तर सरासरी आठ हजार सातेशेवर पोचले होते. सध्या बाजारातील कमी झालेली आवक तसेच नवीन हळदीचा उतारा घटल्याने दरात तेजी आल्याचे सुत्रांनी सांगीतले.

मराठवाड्यातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवामोंढा बाजारात मार्च महिना सुरु होताच हळदीच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या आवक घटल्यामुळे तसेच नवीन हळदीच्या उताऱ्यात घट येत असल्यामुळे दरात तेजी येत असल्याची माहिती जाणकारांनी दिली. दरम्यान सरासरी दरातही सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे अधीक मिळत आहेत. ता. एक मार्च रोजी बाजारात २६८ क्विंटल हळदीची आवक झाली. यास कमाल पंधरा हजार रुपये, किमान सात हजार सातशे तर सरासरी आठ हजार सातशे रुपये दर मिळाला. दोन मार्च रोजी ३५३ क्विंटल हळदीची आवक झाली. यास कमाल नऊ हजार ११० रुपये, किमान सात हजार सातशे तर सरासरी आठ हजार ४४५ रुपये दर मिळाला. 

तीन मार्च रोजी ५४७ क्‍विंटल हळदीची आवक झाली. यास कमाल दर दहा हजार ६० रुपये, किमान सात हजार ७९५ तर सरासरी आठ हजार पाचशे रुपये दर मिळाला. चार मार्च रोजी २१२ क्‍विंटल हळदीची आवक झाली. यास कमाल दर ११ हजार दोनशे, किमान सात हजार ८०५ तर सरासरी आठ हजार ७३५ रुपये दर मिळाला. पाच मार्च रोजी २६३ क्विंटल हळदीची आवक झाली. याच कमाल नऊ हजार रुपये दर मिळाला तर किमान दर सात हजार ६९५ व सरासरी आठ हजार ४९० रुपये दर मिळाला. आठ मार्च रोजी ३४६ क्‍विंटल हळदीची आवक झाली. यास कमाल अकरा हजार सहाशे एक रुपये, किमान आठ हजार तर सरासरी आठ हजार सहाशे रुपये दर मिळाला. नऊ मार्च रोजी ४५१ क्विंटल हळदीची आवक झाली.

यास कमाल नऊ हजार १३० तर किमान सात हजार सहाशे तर सरासरी आठ हजार दोनशे रुपये दर मिळाला. दरम्यान या दरवाढी मागे हळद बाजारात हळदीची वाढलेली मागणी तसेच आवकमध्ये घट झाल्यामुळे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान नव्या हळदीचा उताराही एकरी २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत कमी येत असल्यामुळे दरात सुधारणा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या बाजारात नवीन तशी जुनी हळदही विक्रीसाठी येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव वामनराव पवार आमदुरेकर यांनी दिली.

लागवडीला झालेला उशीर, अतिवृष्टी तसेच करपा रोगामुळे यंदा हळदीचा उतारा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी येत आहे. एकरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत येणारा उतारा यंदा २० ते २५ क्विंटलपर्यंत येत आहे.
- अवधूत कदम, शेतकरी, पांगरी ता. अर्धापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT