file photo
file photo 
नांदेड

चार महिण्यापासून पसार दोघांना अटक; मिळाली पोलिस कोठडी- इतवारा पोलिसांची कारवाई 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : एकावर प्राणघातक हल्ला करुन चार महिण्यापासून पसार असलेल्या दोघांना इतवारा पोलिसांनी मंगळवारी (ता. नऊ) रात्री नांदेड शहरातून अटक केली. त्यांना बुधवारी (ता. १०) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी या दोघांवर इतवारा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ता. २८ आॅक्टोबर २०२० रोजी सायंकाळी कमल अनिल अनेजा याच्यावर काही जणांनी दारुची बॉटल, तलवार, हॉकी स्टिक आणि फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी ईतवारा पोलीस ठाण्यात भादविच्या 307 सह आदी आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणातील मारेकरी फरार होते. इतवारा पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारी रात्री गुप्त माहितीवरुन गुलालसिंग कुलवंतसिंग संधू (वय २९) आणि अमृतपालसिंग जगीरसिंग ढिल्लो (वय २२) या दोघांना अटक केली. दोघे मागील चार महिन्यापासून पसार होते. अटक केलेल्या दोघांना बुधवारी (ता. १०) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या पथकाचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ( इतवारा )  सिद्धेश्वर भोरे आणि इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT