Arrest sakal
नांदेड

लाच घेणाऱ्या पोलिसासह दोघांना नांदेडमध्ये अटक

टिप्परसाठी घेतले २१ हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - वाळूचा टिप्पर नियमित चालू ठेवण्यासाठी २१ हजारांची लाच घेताना एका पोलिस शिपायासह त्याच्यासोबतच्या एकाला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. सहा) रात्री ही कारवाई केली.

वाळूचे तीन टिप्पर नियमितपणे चालवू देण्यासाठी, यापुढे कारवाई न करण्यासाठी प्रतिटिप्पर सात हजार रुपयेप्रमाणे २१ हजारांची मागणी पोलिस शिपायाने तक्रारदाराकडे केली होती. त्यातील सात हजार ''फोन पे’द्वारे स्वीकारले. उर्वरित १४ रक्कम खासगी व्यक्ती मारुती कवळे यांच्यामार्फत स्वीकारली. याबाबत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे शिपाई शिवाजी गंगाधर पाटील (वय ३५, नांदेड), मारुती गोविंदराव कवळे (३४, इळेगाव ता. उमरी) यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, अपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अशोक इप्पर, निरीक्षक नानासाहेब कदम, जमीर नाईक, एकनाथ गंगातीर्थ, सचिन गायकवाड, मारोती मुलगीर, गजानन राऊत आदींनी ही कारवाई केली. उपअधीक्षक इप्पर तपास करीत आहेत.

झडतीत सापडले सव्वादोन लाख

या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेचे १४ हजार जप्त केले. पथकाने झडती घेतली असता पोलिस शिपायाकडे सव्वादोन लाख रुपये सापडले. तेही पथकने जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Padma Awards 2026: राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान; भगतसिंह कोश्यारी, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा समावेश

Chanakya Life Guide : 'या' 2 सवयींमध्ये बदल केल्यास तुम्हाला कोणच फसवू शकणार नाही

Bullet Train: बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गाला वेग! २१ किमी बोगद्यासाठी दुसरी 'टीबीएम' घणसोलीत दाखल

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT