nanded sakal
नांदेड

Nanded Crime : लूटमार, खूनप्रकरणी दोघांना अटक ; नांदेड येथील प्रकरण, वाळूजमधून दोन मोबाईल जप्त

शहरातील हिंगोली गेट परिसरातील खून, लुट प्रकरणातील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. २३) अटक केली आहे. दरम्यान, खून झालेल्या व्यक्तीचा मोबाईल छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात आढळल्याने घटनेबाबत काही पार्श्वभूमी आहे का, याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील हिंगोली गेट परिसरातील खून, लुट प्रकरणातील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. २३) अटक केली आहे. दरम्यान, खून झालेल्या व्यक्तीचा मोबाईल छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात आढळल्याने घटनेबाबत काही पार्श्वभूमी आहे का, याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हिंगोली गेट परिसरातील फटाका मैदानामध्ये पाच जानेवारीला रात्री विकास यशवंत राऊत (रा. सिध्देश्वर वॉर्ड, बोरबन, गणपती मंदिराजवळ, उमरखेड जि. यवतमाळ) याचा धारदार हत्याराने वार करून त्याचा खून झाला होता. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणी तपासाच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांना दिया होत्या.

खंडेराय यांनी पथक स्थापन केले. फौजदार ए. एम. बिचेवार आणि डी. एन. काळे यांच्या पथकाने संशयित भारतसिंघ धारासिंघ बावरी (वय ३५, रा. चौफाळा, नांदेड, हल्ली मुक्काम कळमनुरी, जि. हिंगोली) याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने व त्याचा एक साथीदाराने मिळून विकास राऊत याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, मृताचा मोबाईल छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात चालू झाल्याबाबत तांत्रिक पुरावा मिळाला. भारतसिंघ बावरी याचा मित्र राहुल मोटे याच्याकडून मृत विकास राऊतचा मोबाईल वाळूज येथून जप्त करण्यात आला आहे. मृत विकास हा कामासाठी वाळूज येथे राहत होता. मोबाईलही वाळूजमध्ये आढळल्याने आणखी धागेदोरे हाती लागतात का, याबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पैसै, मोबाईल हिसकावला

दरम्यान, पाच जानेवारीला रात्री अखिलेशकुमार दुबे यांनी त्यांचा मोबाईल व पैसे सक्तीने काढून घेतल्याची तक्रार वजिराबाद पोलिस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्यातील संशयित जसविंदरसिंघ ऊर्फ जस्सी स्वरुपसिंघ रामगडीया याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. हा गुन्हा त्याने व त्याचा साथीदार संशयित भारतसिंघ बावरी व इतर एकाने केल्याचे सांगितले. या दोन्ही गुन्ह्यातील मोबाईल हे वाळूज येथील राहुल मोटे याच्याकडे आढळले. १७ हजार रुपये किमतीचे दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. संशयित बावरी आणि रामगडीया यांना पुढील तपासासाठी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: नाराज इच्छूकांनी अर्ज माघारी घ्यावेत- हसन मुश्रीफ

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT