file photo 
नांदेड

बहिणीचा फोटो काढणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी; धर्माबाद शहरातील घटना

प्रल्हाद कांबळे

नांदेड : बहिणीचा मोबाईलमध्ये फोटो काढणाऱ्या एकाचा जमीनीवर आपटून खून करणाऱ्या दोघांना धर्माबाद न्यायालयालयाने पाच दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही घटना धर्माबाद शहरातील साठेनगर परिसरात शनिवारी (ता. सहा) सायंकाळी घडली होती. 

धर्माबाद येथील साठेनगर भागात राहणारा आकाश शिवराम भंगारे उर्फ पप्प्या याने त्याचा भागात राहणाऱ्या एका मुलीचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढला होता.ही बाब सदर मुलीच्या भावाला समजली. यानतंर त्याने कट रचुन आकाश भंगारे याचा खून करण्याचा निर्धार केला. ता. सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आकाश शिवराम भंगारे या तरुणाला साठेनगरला लागूनच असलेल्या राममंदीर परिसरात मारेकऱ्यांनी गाठले. 

माझ्या बहिणीचा फोटो का काढला म्हणून त्याच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर सचीन पत्रे आणि त्याचा मित्र रोहीत जोंधळे या दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर आकाश भंगारेला जमिनीवर आपटून त्याचा खून केला. त्यानंतरही जमिनीवर आपटले आणि त्याच्या गुप्तांगावर व डोक्यावर कुठल्यातरी हत्याराने प्रहार केल्यामुळे तो जागीच ठार झाला. त्यानतंर हे दोघेही पसार झाले. 

घटनेची माहिती मयताची बहीण गंगासागर लक्ष्मण गायकवाड यांनी धर्माबाद पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सोहन माछरे हे आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास पोलिस निरीक्षक मोहन मात्रे यांनी आपल्या हाती घेतला. मारेकऱ्यांची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही शनिवारी (ता. सहा) रात्रीच ताब्यात घेतले. रविवारी या दोघांनाही धर्माबाद पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश श्री. सोळंके यांनी सचीन पत्रे व रोहित जोंधळे यांना पाच दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

SCROLL FOR NEXT