Arrest sakal
नांदेड

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक

पिस्तूल, जीवंत काडतुस जप्त

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - शहराच्या बायपास शिवनगर खंडोबा चौक परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि बारा जीवंत काडतूस जप्त केले आहेत. ही कारवाई भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांनी बुधवारी (ता. १५) रात्री केली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन तीन चोरटे पसार झाले.

शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पोलिसांना शहरात अवैध अग्निशस्त्र रायफल वापर करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील सर्वच ठाणे प्रभारी रात्रीची गस्त घालत आहेत. बुधवारी रात्री भाग्यनगर पोलिसांची गस्त सुरु असताना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी तरोडा खुर्द परिसरातील खंडोबा चौक भागात शिव रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या रवी नारायणसिंग ठाकूर उर्फ लाला (वय ३२) आणि आनंद यादव (वय २३, दोघेही रा. रवीनगर, जुना कौठा) या दोघांना अटक केली. पोलिस दिसताच अंधाराचा फायदा घेऊन तिघेजण मात्र पसार झाले. पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT