फोटो 
नांदेड

मित्राचा भोसकून खून करणाऱ्या दोघांना अटक

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हस्सापूर शिवारात मंगळवारी (ता. २७) रात्री मित्राचा खंजरने भोसकुन खून करणाऱ्या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी बुधवारी (ता. २७) रात्री नऊच्या सुमारास केली. या दोन्ही आरोपींना लिंबगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 

नांदेड शहरातील खडकपूरा भागात राहणारा महमद वाजीद महमद गौस (वय २९) हा हस्सापूर शिवारात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्याशेजारी दारु पिण्यासाठी सोमवारी (ता. २६) दुपारी गेला होता. यावेळी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लिंबगाव पोलिसांची कारवाई झाली. यात महमद वाजीद यालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळ असलेली सात हजाराची रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्याची सुटका झाल्यानंतर तो जुगार अड्डा चालविणाऱ्या गुड्डू याला तुझ्यामुळे माझे पैसे गेले. ते पैसे मला परत कर असे म्हणून त्याच्याशी वाद घातला. यावरून गुड्डु आणि त्याच्या मित्रांनी संगनमत करून तुला पैसे द्यायचे असे म्हणून घरुन बोलावून हस्सापूर व नसरतपूर शिवारात असलेल्या एका दर्ग्याच्या शेजारी नेले. मंगळवारी (ता. २६) रात्री नऊच्या सुमारास त्याला दारु पाजून खंजरने पोटात भोसकून खून केला. 

दोन्ही आरोपी लिंबगाव पोलिसांच्या स्वाधीन

सुरवातीला माहिती मिळताच पोलिसांच्या हद्दीवरुन बरीच चर्चा झाली. नांदेड ग्रामिण, वजिराबाद आणि लिंबगावच्या सिमेवर ही घटना घडली. शेवटी रात्री उशिरा लिंबगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विष्णुपूरीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वांभर पल्लेवाड यांनी आरोपी गुड्डु, शाहरुख आणि इरफान या तिघांवर महमद मुजीब महमद गौस याच्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार गणेश गोटके करत आहेत. 
 
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या आरोपीच्या शोधार्थ पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सुचना दिल्या. यावरून श्री. चिखलीकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. गुप्त माहितीवरुन श्री. पांचाळ यांच्या पथकानी गुड्डू याला माळटेकडी, बायपास तर इरफान याला ढवळे कॉर्नर सिडको परिसरातून अटक केली. या प्रकरणात अजून दोघेजण असल्याची कबुली गुड्डु यांनी दिली आहे. या दोघांना लिंबगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरूवारी (ता. २८) नांदेड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT