Food Poisoning esakal
नांदेड

Nanded : नांदेडमध्ये दोनशे जणांना विषबाधा, लग्नातील जेवण पडले महागात

लग्नातील जेवणाने दोनशे जणांना विषबाधा झाली.

हफिज घडीवाला

कंधार (जि.नांदेड) : दिग्रस खुर्द (ता.कंधार) (Kandhar) येथे रविवारी (ता.२१) एका लग्नातील जेवणाने जवळपास दोनशे जणांना विषबाधा (Food Poisoning) झाली. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२२) दुपारी गावातील लहान-मोठ्यांना मळमळ, उलटी, चकरा, हातपाय दुखणे, जुलाब येणे असे प्रकार सुरू झाल्यानंतर ही बाब उघड झाली. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. भोजुच्यावाडीचे सरपंच प्रतिनिधी सतीश देवकत्ते यांनी तात्काळ याची माहिती उपकेंद्राला दिली. रुग्णांनी उपकेंद्र गाठले. यानंतर रुणावर उपचार सुरू झाले. काही रुग्णांना कंधार येथे रेफर करण्यात आले असून कोणताही रुग्ण गंभीर नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे यांनी दिली. रविवारी दिग्रस बुद्रुक येथील कल्याणकर कुटुंबात लग्न कार्य होते. लग्न लागल्यानंतर लगेच जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. दुपारी चार वाजेपर्यंत जेवण सुरू होते. रात्री (Nanded) काही झाले नाही. दुसऱ्या दिवशी दुपारपासून लग्नात जेवण केलेल्यांना अस्वस्थ वाटू लागले.

यामुळे विषबाधेचा प्रकार उघडकीस आला. लगेच रुग्णांना गावातील उपकेंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले. ७० ते ७५ रुग्णांना कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक रुग्णावर लक्ष ठेऊन आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे यांनी मंगळवारी (ता.२३) सकाळी दिग्रस खु. येथील उपकेंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आणि काही रुग्णांना कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. घटनेची माहिती समजताच उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर, तहसीलदार संतोष कामठेकर यांनी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णाची विचारपूस केली व परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या सर्व रुग्णाची प्रकृती स्थिर असून बऱ्याच जनावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh PM salary: भारत VS बांगलादेश PM! कोण घेतो जास्त पगार? कुणाला मिळतात ‘राजेशाही’ सुविधा? सत्य जाणून घ्या...

Nashik Rural News : पतीला वाचविताना महिलेचा दुर्दैवी अंत; विहिरीजवळ विजेचा धक्का बसला अन् क्षणात सुखी संसार झाला उद्ध्वस्त!

T20 World Cup: पांड्या-किशनचा नामिबियाला दणका; भारताचा विक्रमी विजय

Kolhapur Municipal Revenue : आर्थिक वर्ष संपत आले तरी महापालिकेचे उत्पन्न ७२ टक्क्यांवर; आताच उद्दिष्टापेक्षा १७९ कोटींची तूट

Mumbai Fire: मुंबईत थरार! ४५ मजली भव्य इमारतीत भीषण आग, काही मिनिटांत खळबळ! व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT