नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

याप्रकरणी उस्माननगर व कुंटुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. ऐन पेरणीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून नांदेड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी उस्माननगर व कुंटुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. ऐन पेरणीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की लोहा तालुक्यातील सुगाव येथील राजकुमार शंकर शिरसे (वय 38) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे त्यांनी बँकेचे कर्ज काढले, परंतु शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला. अखेर त्यांनी ता. 26 जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अनुसयाबाई शंकर शिरसे यांच्या माहितीवरून उस्माननगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास श्री कानगुले करत आहेत.

हेही वाचा - कोवीड लसीकरणात महावितरणची आघाडी; ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

तर दुसर्‍या घटनेत नायगाव तालुक्यातील अंतरगाव येथील शेतकरी मारुती विठ्ठल उर्फ माधवराव शिंदे ( वय ३५ ) यांनीही सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून ता. 28 जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंतरगाव शिवारातील प्रभू यशवंत शिंदे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्वर गंगाधर शिंदे यांच्या माहितीवरुन कुंटुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार श्री कानगुले करत आहेत.

येथे क्लिक करा - मोठी बातमी ! शिक्षकांसह महापालिकेशी संलग्नित विभागांमधील काही कर्मचाऱ्यांनी एक डोस घेतला, परंतु दुसरा डोस घेतलाच नाही, अशांची संख्या लक्षणीय आहे.

एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

बालाजी हुलन्ना पानगटवाड (वय 26) राहणार गोजेगाव, तालुका मुखेड हा शेतात तननाशक फवारणी करण्यासाठी गेला होता. फवारणीसाठी पाणी आणण्याकरिता तो विहिरीवर गेला असता त्याचा पाय घसरुन तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार श्री वाडेकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT