नांदेड

बैलगाडी उलटली, पुराच्या पाण्यात दोन सख्ख्या जावा गेल्या वाहून

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - लोहा (Loha) तालुक्यातील नसरत सावरगाव येथे सोमवारी (ता.३०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक ढगफुटीसारखा पाऊस झाला. या वेळी गावाजवळ असलेल्या नदीला पूर आला. या वेळी पुराच्या पाण्यातून (Nanded) मार्ग काढताना बैलगाडी उलटली असून यात दोन सख्ख्या जावा वाहून गेल्याची घटना घडली. मणकर्णाबाई बापुराव दगडगाव (वय ५२) व पार्वतीबाई संभाजी दगडगावे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव येथील शेतकरी अमोल दगडगावे हे आपल्या शेतात (Rain) काम करण्यासाठी गेले होते. पावसाचे पाणी वाढल्यामुळे ते आपल्या बैलगाडीसह घराकडे येत होते. रस्त्यावर नदी आहे. नदी ओलांडून येताना अचानक नदीला पुराच्या (Flood) पाण्याचा लोट आला. पुराचा लोट आल्यामुळे बैलगाडी उलटी होऊन वाहून गेली.

गाडीमध्ये अमोल दगडगावे, भाऊ विवेक दगडगावे, पत्नी शिवमाला अमोल दगडगावे, आई मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, चुलती पार्वतीबाई संभाजी दगडगावे हे पाच जण होते. त्यातील मणकर्णाबाई बापुराव दगडगावे (वय ५२) यांचा हुलेवाडी येथील पुलाजवळ तर पार्वतीबाई संभाजी दगडगावे (वय ४५) यांचा परभणी जिल्ह्यातील पेंडू (ता.पालम) येथे मृतदेह सापडला. या दोन्ही महिला सख्ख्या जावा आहेत. या वेळी अमोल दगडगावे, विवेक दगडगावे, शिवमाला दगडगावे यांनी झाडाच्या फांदीला धरुन आपला जिव वाचवण्यात यशस्वी झाले. तसेच बैल जोडीही वाहून गेली असून त्यांचा शोध उशिरापर्यंत सुरु होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह लोहा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT