File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात दोन हजार रुपयांची नोट झाली दुर्मिळ

प्रमोद चौधरी

नांदेड : सध्या सर्वात मोठी असलेली दोन हजाराची नोट गत दोन वर्षापूर्वी नोटबंदी नंतर बाजारपेठेत दाखल झाली होती. त्यावेळी ही दोन हजार रुपयाची नोट चांगल्या प्रकारे चलनात होती. मात्र, काही दिवसातच या नोटा बाजारपेठेत दुर्मिळ झाल्या आहेत. सरसरी इतर नोटा बाजारात पाहायला मिळतात. परंतु, दोन हाजार रुपयाची नोट एखादवेळेस नजरेस पडते. तेव्हा या मौल्यवान नोटा गेल्या तरी कुठे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. 

व्यवहारात देवान-घेवान करण्यासाठी नोटा हे महत्त्वाचे साधन आहे. कुठलीही गोष्ट खरेदी करण्यासाठी बाजारात येणाऱ्या नोटा चलनात असतात. यात १०, २०, ५०, १००, ५०० रुपयाच्या नोटा सध्या सरासरी निदर्शनास पडतात. मात्र, या सर्व नोटांमध्ये मोठी असणारी दोन हजार रुपयांची नोट मात्र क्वचितच पहायला मिळते. सदर नोटा बँकेतही कमी पाहायला मिळतात व इतर व्यवहारातही मोजक्या स्वरुपातच निदर्शनास पडतात. तेव्हा दोन हजार रुपयाच्या नोटाना ब्रेक लागला तरी कुठे? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. 

अनेकांच्या मते दोन हजाराची नोट ज्यांच्याकडे गेली ती तिथेच थांबते, बाहेर पडत नाही. मोठ्या नोटा असल्याने कमी जागेत मोठी रक्कम जमविल्या जाते. या नोटा पूर्वी चलनात चांगल्याप्रकारे होत्या. मात्र, आता त्या जणू चलनातून बाद झाल्यात की काय? असे वाटू लागले आहे. बाजारपेठेत या नोटा अगदीच कमी प्रमाणात असल्याने बँकेकडे देखील दोन हजार रुपयांच्या नोटा निदर्शनास येत नाहीत. तेव्हा स्थिरावलेल्या या नोटा कधी बाहेर पडतील? इतर नोटांच्या तुलनेत दोन हजाराची नोट सध्यातरी पीछाडीवर पडली आहे. 

बॅंका व एटीएममधूनही हद्दपार
केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याहोत्या. त्यावेळी निर्माण झालेल्या चलनटंचाईवर उपाय म्हणून दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात दाखल केली. मात्र, ही नोटच आता चलनातून गायब झाल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे बॅंकांसह एटीएममधूनही दोनहजार रुपयांच्या नोटा हद्दपार झाल्याचे वास्तव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT