Umri lake depleted has increased talukas villages Administration sluggish  sakal
नांदेड

नांदेड : उमरीच्या तलावातील साठा संपुष्टात

प्रशासन सुस्त : तालुक्यातील व गावांतील पाण्याचे संकट वाढले

प्रल्हाद हिवराळे

उमरी : उन्हाची दाहकता वाढल्याने शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक बंधाऱ्यातील साठा संपुष्टात आला आहे. परिणामी उमरी तालुका व गावांतील पाण्याचे संकट वाढले आहे. अनेक दुर्गम गावात आतापासूनच विहीरी आटल्या असून हातपंप उघडे पडले आहेत. त्यामुळे तालुक्यांत भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रकही पूर्णतः बिघडले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे कोळेगाव, तळेगाव, धानोरा, हिपनाळ, गोरठा या भागा लगत असलेल्या वाडी- तांड्यावर घरी असलेल्या लहान मुलांना व वृद्धांना पिण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात सर्वदूर दिसत आहे.

तालुक्यातील गावांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तालुक्यात शाश्वत जलस्त्रोतांचा आभाव असल्याने नेहमीचाच उन्हाळा व नेहमीचीच पाणी टंचाई असे चित्र पाहायला मिळत आहे. पाणी पातळी खोल गेल्याने पाणी पुरवठा योजना, हातपंप, विहिरीतील पाणी साठवण क्षमता कमी असने यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत आहेत. या पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती करणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याच्या बाहेरच्या झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वताचे जलसाठे तयार करून पाणीपुरवठा योजना तयार करणे आवश्यक आहेत. तर दुसरीकडे शुद्ध पाणी विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. या व्यवसायावर कोणाचेच नियंत्रण नाही, पाण्याची शुध्दता तपासणी केली जात नाही, अशी परिस्थिती आहे. तर संतप्त नागरिक आपला विविध मार्गांनी आपला रोष व्यक्त करित आहेत.

उपाययोजनांची गरज

तालुक्यात यंदा पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा चांगले झाल्यामुळे टंचाईची तीव्रता तितक्या प्रमाणावर नाही. त्यातच दोन-तीन गावातील अधिग्रहण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले तर चांगले होईल. तसेच तलाठी व ग्रामसेवकांच्या माध्यमातून ज्या गावात नळ योजनेची कामे नादुरूस्त असतील त्या ठिकाणी नळ, हातपंप दुरूस्तीसाठी गावपातळीवर निर्णय घेण्यासाठी सूचना दिल्या तर योग्य हाईल.

हातपंपसुद्धा नादुरुस्त अवस्थेत

उमरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात सध्या मुबलक पाणी साठा शिल्लक असून नगर पालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे कमी अधीक दिवसाला पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील अनेक भागातील हातपंपसुद्धा नादूरूस्त अवस्थेत असून नादुरूस्त हातपंपाची तत्काळ दूरूस्ती करून जनतेला टंचाईपासून दिलासा देण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT