Unclean Garbage 
नांदेड

नांदेड : अस्वच्छतेमुळे धर्माबादकरांचा कोंडतोय श्वास

शहरात गल्लीबोळात कचऱ्याचे ढिगारे; स्वच्छ, सुंदर शहराच्या स्वप्नांचा होतोय चुराडा

सकाळ वृत्तसेवा

धर्माबाद : शहरातील नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ भारत’ अभियानाची जाहिरात अनेक मुख्य ठिकाणी फलकावर करण्यात आली आहे. या जाहिरातीकडे पाहिल्यानंतर शहर किती सुंदर असेल असा प्रश्न पडतो. मात्र प्रत्यक्षात शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. नगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे मागील काळात दिलेले टेंडरचा कालावधी दोन महिन्यांपूर्वी संपलेला आहे. त्यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन साफसफाई योग्य पद्धतीने केल्या जात नाही. त्यामुळे शहरातील गल्लीबोळात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. कचरा नियमित उचलला जात नसल्याने धर्माबादकरांचा श्वास कोंडत असून स्वच्छ, सुंदर शहराच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे.

धर्माबाद नगरपालिकेत प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर धर्माबादकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. धर्माबाद नगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे मागील काळात दिलेले टेंडरचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे धर्माबाद शहरातील घनकचरा व्यवस्थापन साफसफाई योग्य पद्धतीने केल्या जात नाही. शहर प्रभागातील कचरा घेऊन जाणाऱ्या नगरपालिकेच्या घंटागाड्या गल्लीबोळात दररोज दारोदारी फिरकत नसल्याने कचरा कुठे टाकावा हा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे नागरिक कचरा नाल्यात फेकून देत असल्याने नाल्या कचऱ्याने भरल्या असून तुंबल्या आहेत.

नगरपालिका प्रशासनाचा कारभार ढिसाळ झाल्याने शहरातील अस्वच्छता वाढली आहे. नाल्यातील गाळ काढला नसल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी सुटत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन टेंडर संपून जवळपास दोन ते तीन महिन्याचा कालावधी होत आलेला आहे. परंतु अद्याप धर्माबाद नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची नवीन टेंडर काढून योग्य ती कार्यवाही न केल्यामुळे शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचे नवीन टेंडर चालू करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी धर्माबाद नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर तात्काळ नव्याने भरून शहरात वाढणारी दुर्गंधी दूर करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख अनिल कमलाकर यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT