file photo 
नांदेड

कोरोनाकाळात एकमेकांना समजून घ्या

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. जगात मानव जातीचे वेगळे महत्त्व आहे. एकमेकांना मदत करणारी ही मंडळी सध्या कोरोना    काळात एकमेकांना समजून घेण्यासाठी कमी पडत आहे की काय असे वाटत आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र हाहाःकार माजलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नांदेडमध्येही कोरोनाचे रुग्ण अलीकडे खूप वाढत आहेत. ही संख्या हजाराच्या दिशेने वाटचाल करत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी या बाबतची प्रचंड भीती मनात बसलेली आहे.

तसे पाहिले तर प्रत्यक्षात हा रोग दोनशेपेक्षा अधिक देशांमध्ये झपाट्याने पसरलेला आहे. भारतातही जवळपास सर्वच राज्यात या रोगाने पाय पसरलेले आहेत. त्यामुळे या रोगांच्या बाबतीत कोणालाही द्वेषबुद्धीने, द्वेषभावनेने बोलणे, वागणे किंवा पाहणे हे चुकीचेच ठरेल. हा रोग पृथ्वीवरून जाणार नाही, असे सर्वसामान्य तसेच या क्षेत्रातील वैद्यकीय व जाणकार लोकांचे मत आहे. नांदेडला पवित्र सचखंड गुरुद्वारा आहे. या गुरुद्वाराच्या माध्यमातून तसेच    लंगरसाहिबच्या माध्यमातून दररोज चार ते पाच लाख लोकांची पोटाची भूक भागविली गेली. लंगरसाहिबमधून मिळणारी मदत ही गोरगरिबांना ऑक्सिजनप्रमाणे गरजेची वाटत होती. व ती गरजेची पण आहे.  तसे पहिले तर आजही गोरगरिबांना अन्नधान्याची मदत व दोन वेळच्या जेवणाची गरज आहे. आज कोरोनामुळे गोरगरीब व त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे हाल होत आहेत. 

माणसाने माणुसकी विसरली नाही पाहिजे हे देखील तेवढेच महत्त्वाचे 

प्रत्यक्षात आज जेव्हा आपण बाजारात खरेदीसाठी बाहेर पडतो किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणार्‍या लोकांना घराबाहेर पडावे लागते अशा परिस्थितीत ज्या लोकांमुळे कोरोना पसरला असा समज आहे, अशी मंडळी जवळपास वावरली तरी लोक त्यांच्यापासून दोन हात दूर जात आहेत. ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली यावर विचार करण्याऐवजी माणसाने माणुसकी विसरली नाही पाहिजे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. माणूस एकमेकांना पाहत असताना, गाडीवर जात असताना किंवा बाजारात भाजीपाला खरेदी करत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे. सोशल     डिस्टन्सिंग पाळणे चुकीचे नाही, परंतु एखाद्या व्यक्तीबद्दल विशिष्ट द्वेषभावना ठेवणे हे नक्कीच चुकीचे आहे. त्यामुळे कोणाबद्दलही कोणीही द्वेषभावना   ठेवू नये प्रत्येकाशी आपुलकीने, प्रेमाने वागावे हे करत असतांना आपल्याला कोरोनाची लढा द्यायचा आहे हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे वाटते. 

कुठल्याही समाजाबद्दल द्वेषभावना ठेवणे चूकीचेच

नांदेडवर जेंव्हा-जेंव्हा संकट आले, त्यावेळी शिख बांधवानी केलेली मदत अविस्मरणीय आहे. केवळ नांदेडातच नव्हे तर देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर जे जवान मुठीत जीव घेवून लढतात, त्यामध्ये शिख बांधवाचा मोठा सहभाग असतो. देशाच्या पातळीवर शिख समाजाने मोठा हातभार लावलेला आहे. कुठल्याही समाजाबद्दल द्वेषभावना ठेवणे चूकीचेच आहे. नांदेडचे महत्त्व कुठल्या एक- दोन राज्यापूरते मर्यादीत नसून जगाच्या पाठीवर श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्यामुळे नांदेडची वेगळी ओळख आहे. ती जपणे व सर्वांच्या मनात कायम राखणे हे आपल्या नांदेड वासियांचे आद्यकर्तव्य आहे. 

समाजसेवा करणारा हा घटकही यामधून सुटला नाही

सध्या नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आठशेच्या जवळ आहे. तर ४२ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला. आता पत्रकार बांधवही कोरोनाग्रस्त झाले आहेत. समाजसेवा करणारा हा घटकही यामधून सुटला नाही. डाॅक्टर, पोलीस, पत्रकार यांनी कोरोना काळात खूप काम केले. त्यांच्याकडे पाहत असताना आपले मित्र, सहकारी म्हणून पहा. उद्याला ते कोरोनावर मात करून बाहेर येतील. त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आपले  समजून चांगली वागणूक द्या. संबंधांमध्ये कधीही कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनातून आपली सर्वांची सुखरूप       सुटका व्हावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शब्दांकन- अभयकुमार दांडगे-नांदेड
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Rain Update: पुणे-मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची हजेरी, या' जिल्ह्यांत अलर्ट जारी; मान्सूनचा परतीचा प्रवास तीन दिवस आधीच सुरु

Masala Paneer Rolls: मुलांच्या टिफिनसाठी १० मिनिटांत बनवा मसाला पनीर रोल्स, सोपी आहे रेसिपी

माेठी बातमी! ‘सारथी शिष्यवृत्ती बंद’मुळे शिक्षण धोक्यात; अल्प उत्पन्न गटातील ७० हजार मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर परिणाम

Satara Fraud: 'कर्जाच्‍या आमिषाने २४ लाखांची फसवणूक'; सहा महिन्‍यांनंतर संशयित गजाआड, १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

बळिराजाला पडलाय ‘जगावे की मरावे’ असा प्रश्‍न! सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दीड महिन्यात १४२ कोटींचे नुकसान; भरपाईसाठी असणार ‘हा’ निकष

SCROLL FOR NEXT