file photo 
नांदेड

बेरोजगार दिव्यांगांनी अर्थमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह राज्याच्या अर्थसंकल्पाची केली होळी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या संसर्गामुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील विस लाखांच्या वर संख्या असलेल्या दिव्यांगाच्या कल्याण व पुनर्वसनासाठी अर्थसंकल्पात तरतूद न ठेवल्यामुळे तसेच वाढती बेरोजगारीसह गत पाच ते सहा महिन्यांपासून रखडलेल्या निराधार मानधनासाठीही अद्याप निधी उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड आणि संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी नांदेड यांच्याकडुन सोमवारी (ता. २२) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह राज्याच्या अर्थसंकल्पाची होळी करत आपला रोश व्यक्त केला आहे.

या दरम्यान पोलिसांनी आंदोलन कर्त्यांकडील अर्थमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेताच दिव्यांगांकडुन अर्थमंत्र्यांच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी परीसर दणानुन काढला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना एक निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की एवढ्यावरच जर शासन स्तरावरुन अर्थसंकल्पात सुधारणा करुन दिव्यांगांसाठी भरीव तरतूद न ठेवल्यास लवकरच यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे आणि यास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आजच्या या आक्रमक होळी दहन आंदोलनात राहुल साळवेसह प्रदिप गुबरे, विष्णु जायभाये, फेरोज खान हदगावकर, अमरदिप गोधने, नागनाथ कामजळगे यांच्यासह असंख्य दिव्यांग सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा मृत्यू; एक जण गंभीर

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

Kolhapur Gokul Election : गोकुळ निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं; भाजपने सर्व 25 जागांसाठी लावली ताकद, पाहा काय म्हणाले अमल महाडिक?

Sindhudurg ST Bus Accident : सिंधुदुर्गात थरारक अपघात; अरुणा धरणाजवळ मातीचा भराव ओलांडून थेट 200 फूट खोल दरीत कोसळली एसटी बस, 13 प्रवासी जखमी

India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

SCROLL FOR NEXT