file photo 
नांदेड

दुर्दैवी घटना : पुत्र प्राप्तीचा आनंद काही तासासाठी ठरला, पित्याचा...

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड ) : घरात नवा चिमुकला पाहुणा आला की, घरात आनंदाला पारावार राहत नाही. पण हाच आनंद एका ढोलकीपटुला काही तासासाठी ठरला आहे. शहरातील ढोलकीपटुला शनिवारी (ता. २६) रात्री आज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शहरातील अर्धापूर- नांदेड रस्त्यातील रवीराज बारच्या परिसरात घडली. सदरील ढोलकीपटुचा मृतदेह रस्त्यावरील टॅक्टर ट्राॅलीच्या बाजूला रविवारी दुपारी आढूळन आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहित अशी की, शुभम संजय तांबे (वय २३) रा. राजुरा, ता. मुर्तीजापूर. जिल्हा अकोला हा भोकरफाटा परिसरातील एका कला केंद्रात ढोलकी वादक म्हणून काम करत होता. त्याला शनिवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. त्याचा मृतदेह रविवारी (ता. २७) दुपारी अर्धापूर रस्त्यावरील रवीराज बारच्या बाजूला रस्त्यावरील एका ट्रॅक्टर ट्राॅलीच्या बाजूला अढळून आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेत मृत्यू झालेला तरुण हा गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ढोलकी वादक म्हणून काम करत होता. अर्धापूर शहरांत किरायाच्या घरात राहत आसे. त्याला तीन वर्षाची एक मुलगी आहे. त्याच्या पत्नीला शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी दाखल करण्यात आले होते. त्याला दुपारी मुलगा झाला. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. हा आनंद काही काळासाठी ठरला. ढोलकीपटुचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: अखेर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा! सुनेत्रा पवारांशी चर्चा करुन घेतला निर्णय

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT