File photo 
नांदेड

नांदेड - बिदर रेल्वे मार्गसाठी जमीन अधिग्रहणासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे निर्देश

प्रमोद चौधरी

नांदेड :  गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला नांदेड- बिदर रेल्वे प्रश्न अखेर मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गावरील जमीन अधिग्रहणासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी (ता.२१) निर्देश दिल्याचे खासदार चिखलीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

नांदेड-बिदर रेल्वे मार्गासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत संवाद साधला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तेव्हा नांदेड - बिदर रेल्वे मार्गासाठी पिंक बुकमध्ये आर्थिक तरतुदी करून घेतली होती. त्यानंतर या मार्गावरील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यापासून सुटला नव्हता.

रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकरच सुटेल
सोमवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे संदर्भातील अडीअडचणी समजून घेण्याच्या अनुषंगाने खासद प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी खासदारांनी नांदेड-बीदर मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी या मार्गावरील जमीन अधिग्रहण करण्याचे संबंधिताना आदेश देण्याची विनंती केली होती. त्यावर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जमीन अधिग्रहण करण्यासाठी तात्काळ कर्यवाहीला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे प्रसिद्दीपत्रकात म्हटले आहे.

मुदखेड-परभणी मार्गाचे लवकरच उद्‍घाटन
दरम्यान मुदखेड- परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणचे काम पूर्ण झाले असून दुहेरीकरण पूर्ण झालेल्या मार्गाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी येण्याची विनंती केली.  मात्र, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मुदखेड-परभणी रेल्वे मार्गाचे उद्घाटन स्थानिक पातळीवर करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. शिवाय परभणी - मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरनाचे काम तात्काळ पूर्ण करण्याचीही विनंती खासदार चिखलीकर यांनी यावेळी केली आहे. 

जमीन मालकांनी सहकार्य करावे
मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न मार्गी लावून मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सेवा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. नांदेड - बिदर रेल्वे मार्गासाठी जमीन मालकांनी सहकार्य करून विकासाच्या नव्या पर्वात सहभागी व्हावे.
- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार (नांदेड लोकसभा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT