unlicensed saw mills demolished Action of forest department at Gadga nanded  Sakal
नांदेड

Nanded News : विनापरवाना चालणारी आरा गिरणी उद्ध्वस्त; गडगा येथे वनविभागाची कारवाई

वन कर्मचाऱ्यांची अडचण वाढणार

सकाळ वृत्तसेवा

नायगाव : गडगा येथील जय सेवालाल साॅ मिल या ठिकाणी विनापरवाना व बेकायदेशीर चालणारी आडवी आरा गिरणी अखेर उद्ध्वस्त करण्याची धाडसी कारवाई नांदेडच्या वनविभागाचे सहायक वनसंरक्षक बी.एन. ठाकूर यांनी शुक्रवारी (ता.तीन) नोव्हेंबर रोजी रात्री केली.

या अनाधिकृत आरा गिरणीला वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले होते. मात्र या कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची अडचण वाढणार असल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

नांदेडचे सहायक वनसंरक्षक बी.एन. ठाकूर यांना देगलूर वनपरिक्षेत्र अंतर्गत कामाच्या तपासणीसाठी (ता.तीन) नोव्हेंबर रोजी आले होते. सोबतीला नांदेडच्या फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व त्यांचे सहकारीही होते. देगलूर परिक्षेत्रातील कामांची तपासणी करत असताना गडगा येथील जय सेवालाल साॅ मिलमध्ये बंदी असलेली आडवी आरा गिरणी असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खात्री केल्यानंतर त्यांनी फिरत्या पथकाला सोबत घेवून गडगा येथे आपला मोर्चा वळवला. जय सेवालाल साॅ मिल या ठिकाणी वृक्षतोड साठा व उभी आरा गिरणी तपासणी दरम्यान त्यांना प्राप्त माहितीनुसार आडवी आरा गिरणीही सुरु असल्याचे आढळून आले. याबाबत साॅ मिलच्या मालकासह स्थानिक वन अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतरही ते निरुत्तर झाले.

जेसीबी मागवून केली कारवाई

आडवी आरा गिरणी विनापरवाना व बेकायदेशीरपणे सुरु असल्याची खात्री पटताच वरिष्ठांना याबाबतीत तातडीने अवगत करुन देत सहायक वनसंरक्षक ठाकूर यांनी सदरची आडवी आरा गिरणीच उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. ताबडतोब जेसीबी मागवून घेत समक्षच सदरची आरा गिरणी उद्ध्वस्त केली. तोडक प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. यावेळी देगलूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे, नरसी वनपरिमंडळाचे वनपाल गुरुपवार व स्थानिकचे वनरक्षक उपस्थित होते.

दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार

सेवालाल साॅ मिलमधील कटईसाठी आलेल्या वृक्षतोड साठा तपासणी पाठोपाठ येथे बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या आडवी आरा गिरणी प्रकरणात सदरच्या साॅ मीलचा उभी आरा गिरणी परवाना रद्द व साॅ मिल सील करण्याची तसेच, संबधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. सोबतच आडव्या आरा गिरणीवर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घातल्याने सदर प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींची संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT