file photo 
नांदेड

नांदेडात अवकाळीचा बळी : सुजलेगाव येथे विज पडून मजूराचा मृत्यू

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : शेतात कापलेला हरभरा जमा करत असतांना पाऊस आला. पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या माधव दिगांबर वाघमारे (वय ४८) या शेतमजुराच्या अंगावर विज पडल्याने त्याचा जागीच गतप्राण झाला. तर एक महीला या घटनेत भाजली आहे. सदरची घटना गुरुवारी (ता. १८) रोजी दुपारी अडीच्या दरम्यान तालुक्यातील सुजलेगाव येथे घडली. 

मागच्या तीन- चार दिवसापासून हवामान विभागाने विजेच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हरभरा, ज्वारी व गव्हाच्या पिकाची कापणी करण्यासाठी एकच धावपळ करत होते. जिल्ह्यात गुरुवारी (ता. १८) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील शेतकरी मारोती कुह्राडे यांनी माधव दिगांबर वाघमारे (वय ४८) याच्यासह अन्य मजुराकडून शेतातील कापून ठेवलेले हरभऱ्याचे पिक एकत्र जमा करण्याच्या कामात व्यस्त होते. यावेळी दुपारी दोनच्या सुमारास अचानक ढग भरुन आले. विजेच्या कडकडासह पाऊस सुरु झाला. 

हरभरा जमा करत असतांना पाऊस आल्याने मजुरासह सर्वजन शेतातील अंब्याच्या झाडाखाली जावून थांबले. यावेळी माधव वाघमारे यांच्या अंगावर नैसर्गीक विज पडल्याने ते जागीच गतप्राण झाले. तर त्यांच्या बाजूला उभी असलेल्या सुमनबाई दिगांबर वाघमारे यांना पण शेकाटा बसल्याने त्या भाजल्या आहेत. यांना तातडीने उपाचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT