नांदेड

Video ; ढग दाटूनी येतात... 

राजन मंगरुळकर

नांदेड ः उच्चांकी तापमान आणि उकाडा याची सवयच जणू नांदेडकरांच्या अंगवळणी पडली आहे. पावसाळा सुरू होणार याची चाहूलसुद्धा सुखावणारी आहे. असेच वातावरण मागील दोन दिवसांत पाहावयास मिळाले. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या सरींनी उकाड्याला घालवून वातावरणात गारवा निर्माण केला. मंगळवारी सकाळपासून नांदेड शहराच्या भोवती निळाशार आकाशात ढग दाटून आल्याने निसर्गाच्या सानिध्यात अनेकजण रममान झाले.   

नांदेड शहर मराठवाड्यातील उष्ण कटिबध म्हणून ओळखले जाते. येथे नेहमीच तापमान सरासरी ओलांडते. कमाल तापमान ४५.५ एवढे नांदेडकरांनी यंदाच्या उन्हाळ्यात अनुभवले आहे. त्यातच ‘कोरोना’चा कहरही या शहरात पहावयास मिळाला. ऋतुमानानुसार सध्या त्या-त्या वेळेस पाऊस, ऊन आणि थंडी पडतेच असे नाही. उन्हाळ्यातही गारांचा पाउस नांदेडकरांनी अनुभवला आहे. यामुळे खऱ्या पावसाचा अनुभव सर्वांनाच घ्यावासा वाटतो आहे. यातच सध्या वातावरण बदलल्याने त्याची मजा घ्यावी वाटणे, हे साहजिकच आहे.   

दिवसा ऊन-सावली, रात्री गारवा...
कडक तापमानाची सवय असलेल्या नांदेडकरांना मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह ऊन-सावलीचा खेळ पाहावयास मिळत आहे. रात्रीच्या सरींनी काही प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी उकाड्यापासून नांदेडवासीयांची पूर्णपणे सुटका झालेली नाही.

रविवारी रात्री पावसाची जोरदार हजेरी 
यंदा हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सूनपूर्व वापसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाळ्यात दमदार पाऊस होणार असे अनेकांना वाटत आहे. शेतकऱ्यांनी त्यानुसार शेतीतील करावयाच्या कामांचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. रविवारी दुपारपासून ढगाळ वातावरण झाले, मग हवेत गारवा निर्माण झाला. रात्री शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी काही भागात पाऊस, तर मंगळवारी ढगांची गर्दी झाली होती. 

ढगांची गर्दी सुखावणारी 
आग ओकणाऱ्या सूर्यामुळे एरव्ही आकाशाकडे न बघणाऱ्या अनेकांच्या नजरा मंगळवारी ऊन-सावलीच्या खेळाने आकाशाकडे वळल्या होत्या. ढगांची झालेली गर्दी आणि त्यातच हवेत निर्माण झालेला गारवा याचा अनुभव नांदेडकरांना हवाहवासा वाटला. एरव्ही हाच अनुभव घेण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जाणाऱ्या अनेकांना शहरात मनमुराद निसर्गाचे चित्र पाहावयास मिळाले.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayushman Card : कोणताही प्रीमियम न भरता मिळवा फ्री Health Insurance, फक्त WhatsApp वर ‘Hi’ ... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

MSEDCL Bribe Case: रीलिज ऑर्डरसाठी लाचेची मागणी भोवली; महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला एसीबीने रंगेहाथ पकडले

Latest Marathi News Live Update : ऑगस्टमध्ये मराठवाडा आणि विदर्भ कोरडे; सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची आशा

'मी दादा कोंडकेसोबत 3 सिनेमे केले परंतु नंतर...'' अशोक सराफ आठवण सांगताना म्हणाले..'ते डबल मिनिंगकडे...'

SCROLL FOR NEXT