नांदेड - बोगस सोयाबीन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची छावाची मागणी 
नांदेड

Video - बोगस सोयाबीन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची छावाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - अनेक ठिकाणी सोयाबीन उगवले नसल्याने बोगस बियाणे असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींसह विविध संस्था, संघटनांनी देखील कृषि विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनेही याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तक्रार करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर सुरु झाला. त्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यातील विविध कृषि केंद्रातून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. सोयाबीन लागवडीकडे नेहमीच शेतकऱ्यांचा कल राहिला आहे आणि नांदेड जिल्ह्यात सोयाबीनची लागवडही मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे सोयाबीनची लागवड केली मात्र, यंदा अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवणच झाली नाही. बियाणे बोगस निघाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारींना सुरुवात झाली. 

छावा संघटनेने दिले निवेदन
अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने चालू खरीप हंगामात सुरू असलेल्या पेरण्यात आलेल्या नामांकित सोयाबीन कंपनीने दुकानदारांमार्फत अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिले आहे. शेतकरी राजाने ते बियाणे पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतात पेरणी केली असता असे बोगस बियाणे उगवलेच नाही. अशा बोगस बियाण्यांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून या कंपनीकडून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आधी तुटवडा, नंतर विश्‍वासघात
नामांकित कंपन्यांनी अगोदर बाजारपेठेमध्ये आपल्या कंपनीच्या बियाणांचा तुटवडा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतक-यांना नंतर बोगस बियाणे उपलब्ध करून दिले आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. अशा उगवण न झालेल्या कंपन्यांवर त्वरीत गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना त्या कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

आंदोलन करण्याचा इशारा
शेतकऱ्यांच्या बाबत त्वरीत निर्णय घेतला नाही तर अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी कृषि विभागाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दशरथ पाटील कपाटे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील तळणीकर, गुरु पाटील, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष दीपक तुडमे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT