Nanded News 
नांदेड

Video- नांदेडमध्ये कोरोना लसीकरणाचा ड्राय रन 

शिवचरण वावळे

नांदेड :  जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, बारड येथील आरोग्य केंद्र, मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जंगमवाडी येथील महापालिकेचे रुग्णालय या पाच ठिकाणी शुक्रवारी (ता.आठ) कोरोना प्रतिबंधात्मक ट्रायल बेस लसीकरण यशस्वी पार पडले.  

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालय व नांदेड वाघाळा महापालिकेच्या संग्रामजी पोमदे जंगमवाडी दवाखाण्यात भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व महापालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश सिंह बिसेन यांची उपस्थिती होती. भेटीदरम्यान जिल्हाधिकारी व आयुक्तांनी रुग्णालयास भेट देऊन कोरोना प्रतिबंधक ट्रायल लसीबद्दल माहिती घेऊन त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या आरोग्य अधिकारी व डॉक्टर, परिचारिका यांच्यासह लस दिलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

१३ हजार चारशेपेक्षा अधिक लाभार्थ्यांची यादी तयार 

पहिल्या टप्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाने जवळपास १३ हजार चारशेपेक्षा अधिक लाभार्थी, कर्मचारी यांच्या नावाची यादी तयार करुन ती यापूर्वीच शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस देताना कुठलाही गोंधळ होणार नाही. याची खबरदारी म्हणून ही ट्रायल बेस घेण्यात आली. 

आरोग्य विभागाची दक्षता

लसीकरण केंद्रावर समांतर अंतर राखण्यापासून ते लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची कशा पद्धतीची काळजी घ्यावी, आय कार्ड तपासणी, हात स्वच्छ धुणे, लसीकरण कक्षात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझर करणे, लसीकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीस अर्धा तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे, एखाद्या लाभार्थ्यास लसीकरणानंतर रिॲक्शन झाल्यास नेमकी काय खबरदारी घ्यावी? अशा अनेक गोष्टींची चाचणी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 

जिल्ह्यातील आरोग्य विभाग सज्ज
फ्रंट लाईनवर कार्य करणाऱ्या लाभार्थ्यांना सर्वप्रथम कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर ही चाचणी घेण्यात आली आहे. यापुढे शासनाकडून कधीही लसिकरणाचे आदेश प्राप्त झाले तरी आरोग्य विभाग सर्व तयारीने सज्ज आहे.
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT