नांदेड : महाराष्ट्रात एक लाख इतके खासगी शिकवणी वर्ग असून, त्यांच्याकडे तीन ते चार लाख कर्मचारी काम करतात आणि त्यांच्यावर २० लाख कुटुंब अवलंबुन आहेत. या शिवाय त्यांच्याकडे विविध माध्यमातून सेवा देणाऱ्या व्यवसायिक वर्ग आणि या सर्वांची संख्या पन्नास लाखाहून अधिक असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष आर. बी. जाधव यांच्या वतीने गुरुवारी (ता.११) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवेदन देऊन खासगी शिकवणी वर्ग सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात श्री जाधव यांनी म्हटले आहे की, खासगी शिकवणी वर्ग हा सेवादेणारा वर्ग असून, महिन्याला कोट्यावधीची उलाढाल होते. त्याद्वारे राज्य आणि केंद्र शासनाला जीएसटी, स्थानिक मालमत्ताकर, आयकर व्यवसायकर असा वर्षाला कोट्यावधीचा कर मिळतो.
हेही वाचा- सलग पावसाने शेतकरी सुखावला
मोबदला मिळण्यापूर्वीच लॉकडाउन झाल्याने नुकसान
मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याकारणाने देशात लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर ता. १६ मार्चपासून खासगी शिकवणी वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. यातील ९५ टक्के लोक खासगी शिकवणी वर्ग चालतात. लॉकडाउनमुळे त्यांची आर्थिक स्थिती नाजुक झाली आहे. वर्षभर शिकवणी दिलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मार्च ते एप्रिल महिन्यात फीस मिळते. परंतू त्यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा झाल्याने वर्षभर मेहनत करुन अनेकांच्या हातात पैसे मिळाले नाहीत.
मागील तीन महिन्यापासून क्लासेस बंद असल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने अजुनही खासगी शिकवणी क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. राज्य सरकारने क्लासेस सुरु करण्यासाठी पुन्हा एकदा फेरविचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
राज्य शासनांच्या सुचनांचे पालन करु
- खासगी क्लासेस (झोननुसार विद्यार्थ्यांची भर्ती) करण्यात येईल
- दहा ते बारा स्वेअर अंतरावर एक विद्यार्थी बैठक व्यवस्था
- प्रत्येक बँचमध्ये अगदी कमीत कमी विद्यार्थी संख्या पुरेसे अंतर असेल
- क्लास चालकांनी घर आणि क्लासेससाठी कर्ज काढले आहे त्यांचे वर्षभराचे व्याज माफ करावे
- सरकारने व्याजी किंवा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्यावे
- सरकारने घालुन दिलेल्या सुचनांचे पालन करु
- मास्क, सॅनिटायझर आणि समांतर अंतर राखून क्लासेस सुरु ठेवण्यासाठी राज्य शासनाने पुनर्विचार करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.