file photo 
नांदेड

Video : विष्णुपुरीच्या रुग्णालयात कोविड केअर सेंटर...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या नाही. तेव्हा आलेल्या प्रत्येक रुग्णाची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. म्हणून रविवारी (ता.१७) पासून अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांच्या उपस्थितीत कोरोना कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.


रुग्णालयातील पॅथालॉजी लॅब अद्ययावत 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाची आरोग्य चाचणी करणे गरजेचे असल्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत डॉक्टर, आशा वर्कर, आरोग्य सेविका यांच्यामार्फत गावापासून ते शहरात राहणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते लॅबमध्ये पाठविण्यात येत आहेत. विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील पॅथालॉजी लॅब अद्ययावत करण्यात आली असून या लॅबमध्ये कोरोनासंबंधी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण यांनी दिली. या वेळी डॉ. श्री. इनामदार यांचीदेखील उपस्थिती होती. 

आरोग्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट 
रुग्णालयात रविवारपासून सुरु करण्यात आलेल्या लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली जात नाही. परंतु, पॅथॉलॉजी लॅबचे नुतनीकरण व लॅबचे अत्याधुनिकरण करण्यात आले आहे. त्याद्वारे रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, ही रुग्ण व डॉक्टरांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. ज्यांना ताप किंवा खोकला, घशात खवखव असेल तर त्या संशयित रुग्णाची वेगळी चाचणी करण्यास व रुग्ण डिटेक्ट होण्यास सोईस्कर होणार आहे.
-डॉ. वाय. एच. चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT