File photo 
नांदेड

Video : लालपरीने स्विकारला माल वाहतूकीचा पर्याय    

शिवचरण वावळे

नांदेड : राज्यांतर्गत खडतर रस्ते, बसटी झालेली भंगारावस्था आणि एसटीच्या प्रवाशांवर खासगी ट्राव्हल्सला द्यावी लागणारी टक्कर यामुळे आधीच परिवहन विभाग तोट्यात जात असताना त्यात कोरोनाचे संकट आल्याने तब्बल ६० दिवस एसटीची चाके थांबल्याने रोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु झाली असली तरी, लोकांची प्रवास करण्याची अजून मानसिक तयारी नसल्याने प्रवाशा विना बस धावत आहे.

प्रवाशाविना धावणाऱ्या बसेसला किलोमीटर मागे ३२ ते ३४ रुपये इतका तोटा सोसावा लागत आहे. त्यामुळे राज्य परिवहन विभागाने चक्क रेल्वे प्रमाणेच मालवाहतूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या मालाची वाहतूकदेखील तितक्याच विश्वासाने करण्याचा विडा उचलला आहे. 

ह्या आहेत अटी -
एखाद्या व्यक्तीचा माल या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेण्यासाठी त्यास २८ रुपये किलोप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. त्याशिवाय मालावर अतिरिक्त १८ टक्के जीएसटी लावली जाणार आहे. परंतु, यासाठी एसटीला किमान तीन हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्याशिवाय बस निघणार नाही. अशी अट ठेवण्यात आली आहे. एका व्यक्तीच्या मालाचे भाडे तीन हजार होत नसेल तेव्हा एकपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन देखील मालाची वाहतूक करणे शक्य आहे.

वाहतुकीला सिमेचे नाही बंधन 
सध्या जिल्ह्यांतर्गत प्रवाशी वाहतूक सुरु आहे. परंतु, माल वाहतुक करण्यासाठी कुठल्याही जिल्ह्याचे अथवा राज्याच्या सिमेचे बंधन नाही. त्यामुळे कुणालाही एका ठिकाण्याहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहुन नेता येणे शक्य आहे. यासाठी एसटी महामंडळाने बस गाड्यांचे रुपांतर मालवाहु गाड्यांमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. 

नांदेड विभागात ११ मालवाहु गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. गाड्यांची मागणी वाढतील त्याप्रमाणे मालवाहु गाड्या उपलब्ध करुन दिल्या जातील. जिल्ह्यातील शेती माल असो वा इतर कुठल्याही प्रकारच्या मालाची वाहतूक करायची असेल त्यांनी जिल्ह्यातील बस आगारास भेट द्यावे त्या ठिकाणी मालवाहतुक करण्यासाठी व त्याची नोंदीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 
- अविनाश कचरे, विभाग नियंत्रक अधिकारी, नांदेड.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Physics NEET Paper Leak Case : नीट फिजीक्सचा पेपर फोडणाऱ्या महिलेचे नाव समोर, सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; तीसरी पण 'मनिषा'च शोधली

America-Iran War: अमेरिका-इराण युद्ध केवळ पाच सेकंदात संपू शकतं; जागतिक वित्तीय संस्था 'जेफरीज'चा खळबळजनक दावा

Farmer loan waiver Maharashtra : शेतकरी कर्जमाफी आचारसंहितेत अडकणार का? पूर्वतयारी अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांनी गुपीत फोडलं

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणात महिलेला अटक

Dog Bite Crisis: माळेगावात पिसाळलेल्या श्वानाचा हैदोस; सात नागरिक जखमी, दोन वृद्ध महिलांना नांदेडला हलविले

SCROLL FOR NEXT