Nanded Photo 
नांदेड

Video - लॉकडाउनचा काळ लोकसंख्या वाढीस कारणीभूत ठरू नये, कोण म्हणाले... वाचा...

शिवचरण वावळे

नांदेड : देशात उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे नाइलाजाने शासनाला टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागला, तो क्रमप्राप्त आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सर्व डॉक्टर्स आणि संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. शनिवारी (ता. ११)  जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिन असला तरी, लोक त्याकडे गंभीरतेने बघत नाहीत. केवळ बघतात ते कोरोना संपणार कधी, त्यावर औषध येणार कधी. परंतू, अचानक ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात देखील लोकसंख्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अन्यथा लॉकडाउनमध्ये लोकसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे स्पष्ट मत स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. किशोर अतनुरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे.

जागतिक लोकसंख्या दिवसाच्या निमित्ताने त्याकडे गांर्भियाने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी झालेल्या टाळेबंदीमुळे आणि यापुढे टाळेबंदीत दळणवळणाच्या सुविधा बंद होत्या आणि राहणार आहेत. तेव्हा नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी औषधी दुकानात असलेली साधने, मर्यादा येणे स्वाभाविकच आहे. अशा वेळेस पती-पत्नीला नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठीची पुरेशी साधने वेळेवर उपलब्ध न झाल्यास त्यातून लोकसंख्या वाढीची शक्यता नाकारता येत नाही. 

साहित्याची पूर्तता करणे गरजेचे

 सर्व आरोग्य यंत्रणा कोरोनाला संपवण्याच्या मागे लागली आहे. हे स्वाभाविक असले तरी, शासनाने महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरापासून ते गावखेड्यातील लोकांपर्यंत गर्भधारणा रोखण्यासाठीच्या साहित्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यासाठी शासनाने विचार करणे गरजेचे आहे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. 

गर्भवती मातेच्या जिवाला गर्भपाताचा सर्वाधिक धोका 

अनेक दाम्पत्यास कामजीवनाचा मनासारखा आनंद घेता यावा आणि आवश्यक तेव्हाच गर्भधारणा व्हावी असे बहुतेक सर्वांनाच वाटते. परंतू, गर्भधारणा रोखण्यासाठी लागणारी साधनेच वेळेवर उपलब्ध झाले नसल्याने नको असलेले बाळ जन्माला येते. अशा वेळी नको असलेले बाळ गर्भात वाढत असते तेव्हा त्या बाळाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषित बाळ जन्माला येणे, बाळाला जन्माला येऊ द्यायचे नसल्यास कायदेशिररित्या गर्भपात करता येणे शक्य आहे. परंतू, त्यासाठी डॉक्टर वेळेवर उपलब्ध होतील का? न झाल्यास गर्भपाताचा दुसरा घरगुती मार्ग अवलंबविला जाऊ शकतो. यात गर्भवती मातेच्या जिवाला सर्वाधिक धोका असतो. 

पुढील काळात शासनाकडून झोपडपट्टी, औद्योगिक वसाहती, गाव खेड्यात आशा वर्करच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन आवश्यक त्यांना नको असलेली गर्भधारणा रोखण्याची आवश्यक ती सर्व साधने पुरविण्यासाठीचे प्रयत्न व्हावेत असे मत डॉ.अतनुरकर यांनी व्यक्त केले आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

SCROLL FOR NEXT