क्राईम न्यूज 
नांदेड

धडाकेबाज कारवाई : जबरी चोरीतील तीन टोळ्या जेरबंद; 11 गुन्हे उघडकीस- नांदेड स्थानिक गुन्हे शाखा

लॉकडाऊन काळात जबरी चोरी, चैन चोरीसारख्या गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. यामध्ये सोन्या- चांदीचे दागिणे, नगदी रक्कम व मोबाईल असा पाच लाख १५ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये जबरी चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणून सात आरोपीना ताब्यात घेतले.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लॉकडाऊन काळात जबरी चोरी, चैन चोरीसारख्या गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. यामध्ये सोन्या- चांदीचे दागिणे, नगदी रक्कम व मोबाईल असा पाच लाख १५ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये जबरी चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणून सात आरोपीना ताब्यात घेतले.

लॉकडाऊन काळात लुटमारीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा तपास लावण्याचे आदेश पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिले. यामध्ये अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, फौजदार असद शेख यांनी गुन्हेगारांची माहिती काढून यश गौतम जोंधळे रा. पिवळी गिरणी व इतर एकास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार गुन्ह्यात सोन्याच्या दागिण्यांसह ६१ हजार ५०० रुपये व किमतीचा ऐवज लंपास केला.

हे आहेत आरोपी

तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे इनकाऊंटर फेम सहाय्य्क पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, फौजदार सचिन सोनवणे, आशिष बोराटे यांनी श्रीनिवास सावंत, बालाजी महाशेट्टे व प्रकाश खवास या तिघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून दोन लाख ४६ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. देगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या चार गुन्ह्यात रणजित गायकवाड, सुभाष श्रीमंगले या दोघांना अटक करुन त्यांच्याकडून सोन्याच्या दागिण्यांसह दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

पाच लाख १५ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

एकंदरीत या कारवाईमध्ये पोलिसांनी ११ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे दागिणे, नगदी रक्कम व इतर साहित्य असा पाच लाख १५ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी जप्त करुन सात आरोपींना अटक केली. अटक आरोपीना वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या स्वाधईन केले आहे. त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि विजय कबाडे यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT