nurse  
नांदेड

नांदेड : एका परिचारिकेवर चालतेय ग्रामीण रुग्णालय

अर्धापूर तालुका : ग्रामीण रुग्णालयाचे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : मोठा गाजावाजा करून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा झाले होते. अपूरे कर्मचारी, साहित्यअभावी या रुग्णालयात उपचार मिळणे कठीण झाले होते. रुग्णालयात सकळी रुग्णांची तपासणी झाल्यानंतर दुपारनंतर पूर्ण रुग्णालयाचा कारभार एक परिचारिकेर असते. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यावर या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले जाते.

राजकीय पाठबळ असलेले वैद्यकीय अधिकारी केवळ नावालाच कर्तव्य पार पाडत आहेत. या रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करुन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी होत आहे.

तालुका स्थापनेपासून तब्बल वीस वर्षे पूर्ण झाल्यावर ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न साकार झाले. शहरासह तालुक्यातील रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सतत पाठपुरावा केला. भव्य इमारत बांधण्यात, अद्यावत शस्त्रक्रिया दालन, आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना उपचार मिळावेत, रुग्णालयात स्वच्छता राहावी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे अशा सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्‍घाटनप्रसंगी केल्या होत्या.

हे रुग्णालय सुरू होवून दोन महिने पूर्ण झाले आहेत. आकृती बंधाप्रमाणे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. पण सध्या हे रुग्णालय नाव मोठे लक्षण खोटे असे झाले आहे. या रुग्णालयात सकळी रुग्णांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी नांदेडला निघून जातात. या रुग्णालयात दुपारनंतर उपचारासाठी आलेल्या रुग्णाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले जाते. येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवतात असा खेळ रुग्णांशी खेळला जात आहे.

वैद्यकीय सेवा देण्याची मानसिकता हवी

या रुग्णालयात नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याची मानसिकता नसल्याने विविध कारणे सांगून अधिकारी व कर्मचारी आपली बाजू कशी खरी आहे हे पटवून सांगत आहेत. जर हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले तर सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण आपल्या मतदारसंघात आरोग्य, शिक्षण या सारख्या मूलभूत सुविधांकडे लक्ष घालत आहेत, पण अधिकारी मात्र नेमके विरूद्ध वागत आहेत. या रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करुन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक बाबुराव लंगडे यांनी केली असून या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT