Omicron variant
Omicron variant sakal
नांदेड

नांदेड : ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे सतर्कतेचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाच्या धोक्यापासून सावरत असताना जगभर नवीन धोकादायक ओमिक्रॉन नावाचा कोरोना विषाणू युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रिया, युके व इतर युरोपीयन देशात आला आहे. त्याचा झपाट्याने होणाऱ्या प्रसारामुळे चिंता वाढली आहे. कोरोनापेक्षा हा नवीन विषाणू पाचशेपट अधिक घातक असल्याने आता सर्व नागरिकांनी लसीकरण आणि मास्कसह दैनंदिन जीवनात पंचसुत्री वापरल्याशिवाय तरणोपाय नाही. आता काळजी घेऊ तरच एकमेंकांना सावरू अशा स्पष्ट शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्हावासियांना आवाहन केले आहे.

कोविड लसीकरण, कायदेशीर दंड, संभाव्य कोरोना विषाणू आणि व्यवस्थापन याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ३०) जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली. त्याचबरोबर बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या लसीकरण प्रमाणपत्राचीही त्यांनी स्वतः तपासणी करून कायदेशीर दंडक याचा प्रत्यय दिला.

ज्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले नाही त्यांचा नोव्हेंबरचा पगार का करू नये? असा सूचक इशाराही दिला. लोकांनी येऊ घातलेला कोरोनाचा विषाणू लक्षात घेता आपल्या वर्तनातून आपण जबाबदार नागरीक असल्याचे कर्तव्य पार पाडावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले आहे. बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी कारण नसताना वाढणारी गर्दी व लोकांची वर्दळ ही चिंतेची बाब आहे. कायदेशीर कारवाईचा बडगा उगारू, असे त्यांनी सांगितले.

"कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत १८ वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे, त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा."

- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी.

"महापालिका प्रशासनाच्या वतीने आढावा बैठक घेऊन सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. ज्यांनी अजूनही लस घेतली नाही त्यांनी तातडीने लस घ्यावी. त्याचबरोबर फिरते तपासणी, पडताळणी पथक तयार करण्यात आले असून उल्लंघन करणाऱ्यांवर अचानक तपासणी करुन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड अनुरूप वर्तनाचे सर्वांनी पालन करावे तसेच आवश्यक असलेल्या वस्तू हॅड सॅनिटायजर, साबण, पाणी व तापमापक आदी गोष्टी उपलब्ध करुन घ्याव्यात."

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT