Water scarcity 
नांदेड

अर्धापुरात पाणीटंचाईची चाहूल; पाणीपुरवठा योजनेची नागरिकांना ‌‌‌‌‌हूल

पाणीपुरवठा योजनेची नागरिकांना ‌‌‌‌‌हूल : प्रशासनाची तारीख पे तारीख

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : शहरातील विविध भागात पाणी टंचाईची चाहूल लागली असून पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे पाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असली तरी अद्याप कार्यान्वित झाली नसल्याने ही योजना ‌‌‌‌‌‌नागरिकांना हूल देत आहे. काम करण्याचा अवधी संपला असताना काम कासव गतीने सुरू आहे. सत्ताधारी नगरसेवक व‌ प्रशासन पाणी पुरवठा करण्यासाठी तारिख पे तारीख देत आहेत.

पाणी पुरवठा करता करता दोन उन्हाळे निघून गेले आहेत पण नागरिकांना पाणी काही मिळत नाही. अर्धापूर शहरातील दुर्गानगर, फुलेनगर, बसस्थानक परिसरात, नवी आबादी भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार आहे. स्थानिक नगरसेवकाला पाणी टंचाई दूर करुन टॅंकरने पाणी पुरवठा मागणी केली तर काही दिवसातच नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे. पाणी पुरवठा योजनेचे पाणी मिळेल तेव्हा मिळेल पण सध्या आमचा जीव जातोय, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.

शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुमारे २८ कोटी खर्चून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील विविध भागात जल वाहिनी टाकने, जलकुंभ बांधकाम, मुख्य जलवाहिनी, जलशुध्दीकरण केंद्र आदी कामे पूर्ण झाली आहेत. पाणी पुरवठा लवकरच होणार आहे असे गेल्या कित्येक महिन्यांपासून सांगण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील पाणी टंचाईच्या मुद्यांववर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शहरातील नागरिकांना लवकरच पाणी पुरवठा योजनेचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. निवडणूक होवून दोन महिने झाले आहेत, उन्हाची तीव्रता वाढत आहे, जलस्रोत आटत आहेत. पण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जात नाही या मुळे आम्ही कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

''पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शहरातील पाणी टंचाई दुर करण्यासाठी महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना तयार करुन मंजूर करून घेतली आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही किरकोळ कामे बाकी आहेत. ही कामे लवकरच पूर्ण होणार असून नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. शहरातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासन उपाय योजना करित आहे.''

- छत्रपती कानोडे, नगराध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT