HENDRICK MOY
नांदेड

Wedding Planning Inflation : सोने-चांदी महागल्याचा परिणाम, विवाहाचे बजेट बिघडले

सोने-चांदी महागल्याचा परिणाम : कुटुंबियांवर आर्थिक बोजा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईला बसू लागली आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने लग्न समारंभ असलेल्या कुटुंबांवर आर्थिक बोजा वाढला आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट विस्कळित झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचे पुन्हा टेन्शन वाढल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

सद्यस्थितीत सोने प्रति दहा ग्रॅम ६२ हजार ७०० तर चांदी प्रति किलो ७८ हजारांवर पोहचली आहे. सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पहायला मिळत आहे. अशातच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. लग्नसराईच्या काळात दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आठवड्यात सोन्यात ७०० रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदीतही एक हजार २०० रुपयांनी दर वाढला. रविवारी (ता.तीन) सोन्याचे दर ६२ हजार ७०० रुपयांवर होते तर चांदी प्रति किलो ७८ रुपये होती.

अशातच सोन्याच्या दरात वाढ होऊन सोने प्रति दहा ग्रॅम १०० रुपयांनी तर चांदी ४०० रुपयांनी महागली आहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा पेट्रोल-डिझेलसह धातूंवर देखील झालेला पाहायला मिळाला आहे. सोने ६२ हजारावर गेले असून जीएसटीसह ६४ हजाराच्या जवळ पोहचले आहे. विशेष म्हणजे सोने यंदा मे महिन्यात ६२ हजाराच्या पार गेले होते. पुन्हा एकदा लग्नसराईच्या मोसमात सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. चांदीने प्रथमच प्रति किलो ७५ हजाराचा आकडा पार केला आहे. याचा परिणाम लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या कुटुंबांवर दिसून येत आहे.

लग्नसराईवर महागाईची छाया

तुळशी विवाह संपताच लग्नसोहळे सुरु झाले आहेत. अशा स्थितीत लोकांना महागड्या किमतीत दागिने खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. महागाईची छाया लग्नसराईवर दिसत आहे. लग्नसराईचा हंगाम पाहता येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

लग्नसराई आणि जागतिक स्तरावर अस्थिरता आलेली असल्याने सोन्या-चांदीची मागणी वाढलेली आहे. तसेच लग्नसराईत सर्वाधिक सोन्याची खरेदी होत असतानाच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. पुढील काही दिवसात सोन्या-चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे. लवकरच सोने ६५ हजाराच्या जवळपास जाईल.

- महेश भगवान टेहरे,

सोने व्यापारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT