File photo 
नांदेड

कशामुळे होत आहे वरमाईचा हिरमोड?, ते वाचलेच पाहिजे

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनाच्या टाळेबंदीत लग्न सोहळ्याचा धडाका अजूनही सुरुच आहे. टाळेबंदी उठल्यावर धुमधडाक्यात लग्न करण्याचे स्वप्न रंगवणाऱ्या वर-वधूंना दीर्घ प्रतिक्षेनंतर चार भिंतीच्या आत लग्न विधी उरकावे लागत आहेत. त्यामुळे वधू पित्यांचा हजारो रुपये खर्च वाचत आहे. तसेच लग्न सोहळ्यात वरमायची कुठेही वरवर होत नसल्याने त्यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे. 

आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी कर्ज काढून लग्न धुमधडाक्यात करणं, हे आपल्याला जराही चुकीचं वाटत नाही. नंतर कर्ज फेडू पण; लग्न थाटामाटात करू असंच सगळ्यांचं म्हणण असतं. थाटामाटात लग्न करायचं म्हणजे किमान दोनशे ते तीनशे माणसं पंगतीला हवीतच. मामाच्या काकाचा चुलत सासरा आणि आत्याच्या ननंदेची मावस सासू इथपर्यंत नाती जुळवून लग्नाची आमंत्रण देण्यावर दोन्हीकडील मंडळीचा भर असतो.

लग्नाला नुसती माणसं येत नाहीत तर ती वऱ्हाडी असतात. त्यांना एकेकाळी लग्नाला बोलावलं जात नसे, तर ‘मांडवशोभेला’ या असं आग्रहाचं आमंत्रण असे. लग्नाच्या कपड्यांची नुसती खरेदी होत नाही; तर बस्ता बांधला जातो. पूर्वीच्या लग्नामध्ये मंडळी पैजेवर जिलेब्या आणि लाडू रिचवत. मांडव उभारणीच नाही तर मांडवपरतणी देखील विधीवत केली जात असे.

हे देखील वाचाच - कौतुकास्पद : सफाई कामगाराच्या मुलांनी नाव कमावलं, तिघेही झाले एमबीबीएस
 
यंदा आमच्याकडे ‘कर्तव्य ’आहे, असं काहीजणांनी जाहीर केली की, पुढचे कांद्यापोह्याचे सोपस्कार होऊन यथासांग लग्न ठरत असे. घरात लग्न निघालं की लगीनघाई आहे असं उगाच म्हणत नाहीत. नव्या जोडप्याला नव्या नवलाईची घाई, सासूला हाताखाली सून येण्याची घाई आणि आजीला सुनसुखच काय तर नातवंडही बघायची घाई. लहानपणीच्या भातुकलीच्या खेळापासूनच जणू ही घाई करायला शिकवलं जातं. 

हल्ली लग्नाचे इव्हेंट होऊ लागले आहेत. दारात मांडव घालून घरी सगळ्यांनी जमून काम वाटून घेत लग्न लावायचा जमाना केव्हाच काळाच्या पडद्याआड गेला आहे. आमंत्रण आलं की ‘लग्नाला चला’ म्हणत आनंदाने मांडवशोभा म्हणून जाणारी सगळी मंडळी यंदा सरकारमान्य ५० जणांच्या यादीत आपण आहोत का? या विवंचनेत आहेत. तर वरमाय, करवल्या दुःखी झालेल्या आहेत. एकूणच कोरोनाने यंदाची मांडवशोभा घालवली आहे.

मुलीच भेटायला तयार नाहीत
मुलींच्या संख्येत कमालीची घट झाल्याने हुंडाही बंद.  कठोर कायदा अस्तित्वात असताना देखील हुंड्याची मागणी वर पित्याकडून सातत्याने केली जायची. मात्र आता मुलीच्या संख्येत कमालीची घट झाल्याने,  त्यातच मुलीचा छळ होवू नये यासाठी वधूपिता पारखून स्थळ शोधत आहे. मुलीच भेटायला तयार नाहीत म्हणून हुंड्याची परंपराही काहीप्रमाणात मोडकळीस येत असल्याचे वास्तव सध्यातरी बघायला मिळत आहे.
- अशोकराव पिंप्रीकर महाराज, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT