mule.jpg 
नांदेड

कोरोना इफेक्ट; सोशल डिस्टन्सिंग पाळत झाले शुभमंगल!

स्वप्निल गायकवाड


नांदेड ः कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात अनेकांची लग्न खोळंबली होती. त्यामुळे अनेकांनी आपली लग्न पुढे ढकलली आहेत, तर काहींनी साध्या पद्धतीने लग्न उरकली आहेत. नांदेडमध्येही एका परिवाराने अत्यंत साध्या पद्धतीत मंगळवारी (ता. १२) ठरलेल्या वेळेत आणि मुहूर्तावर घरातील अंगणात लग्न केल आहे. भाग्यश्री माणिकराव मुळे व अरविंद किशनराव पानपट्टे असे या नवदांपत्याची नावे आहेत. विशेष म्हणजे या लग्नात मोजकेच नातेवाईक वऱ्हाडी बनून आले होते.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही कोरोनो व्हायरससदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हा सोहळा म्हणजे कोरोना व्हॉयरसच्या पार्श्वभूमीवर तरोड्याच्या मुळे आणि पानपट्टे कुटुंबीयांनी सर्व समाजाला कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी नेमकं काय करावं या बाबत दिलेलं मोठं उदाहरण म्हणावं लागेल. गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही कुटुंबांतील मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. तरोड्यातील ‘लक्ष्मी गार्डन’ येथील मंगल कार्यालयात (ता. १२) मे रोजी मोठ्या थाटा माटात हे लग्न पार पडणार होतं. पण कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि दोन्ही कुटुंबीयांचे मोठ्या थाटात लग्न करायचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले. कारण केवळ १५ ते २० जणांच्या उपस्थितीतच हा लग्न सोहळा पार पडण्याची यांच्यावर वेळ आली. विशेष म्हणजे नवरदेव अरविंद पानपट्टे हे स्वतः शिक्षक आणि वधू भाग्यश्री उच्च शिक्षित आहे. त्यांनी पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय घेत केवळ मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत सोहळा उरकण्याचे मान्य केले.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन
लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी विवाहसोहळा रद्द करणे किंवा पुढे ढकलले जात आहेत. लॉकडाउन दरम्यान गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम करण्यास बंदी आहे. मात्र, याचदरम्यान काही लोक असे आहेत की, जे लग्न पुढे ढकलण्याऐवजी ठरलेल्या तारखेलाच सोहळा उरकून घेत आहेत. मात्र, बँड बाजा आणि वरातीशिवाय अगदी साध्या पद्धतीने लग्न सोहळा उरकला जात आहे. यादरम्यान काही लग्न अशीदेखील पाहायला मिळाली ज्यात पुरेपूर सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं. लॉकडाउनदरम्यान अनेक जणांचे विवाह पाहायला मिळाले आहेत. पण अरविंद व भाग्यश्री यांच्यासारखा लग्न सोहळा हा फारच क्वचित पाहायला मिळतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्तावावर आज स्थायी समितीत निर्णय होण्याची शक्यता

IPL Trade Records: हार्दिक पांड्या-अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडने इतिहास घडवला; आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ट्रेड ठरला...

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम! ११ कंपन्यांची उड्डाणे नवी मुंबईतून, नवे टर्मिनल उभारणार; प्रशासनाचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT