file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात आजपासून काय बंद, काय सुरु राहणार...? वाचा....

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोराना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात शुक्रवार (ता. २४) जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवार (२४ जुलै) पासून पुढील आदेशापर्यंत राज्य शासनाच्या सुचनेनुसार तसेच यापुर्वीच्या आदेशातील नमूद निर्देशानुसार नांदेड जिल्‍ह्यात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून खालीलप्रमाणे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहेत.

संपूर्ण नांदेड जिल्‍ह्यात पुढील प्रमाणे बाबी प्रतिबंधित राहतील

सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्‍था व शिकवणी वर्ग इ. बंद राहतील. तथापि ऑनलाईन, आंतर शिक्षण यास मुभा राहील. हॉटेल / रेस्‍टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्‍या सेवा हया गृहनिर्माण, आरोग्‍य, पोलीस, शासकिय अधिकारी, आरोग्‍य सेवा कर्मचारी, पर्यटकांसह अडकलेल्‍या व्‍यक्‍ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच वरील सेवेसाठीच बसस्‍टॉप, रेल्‍वेस्‍टेशन येथे चालू असलेल्‍या कॅन्‍टीनचा सुध्‍दा वापर करता येईल. रेस्‍टॉरंटला खाद्यपदार्थाच्‍या होम डिलेव्‍हरीसाठी स्‍वयंपाकघर वापरण्‍यास मुभा असेल.

हे बंद राहतील

सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्‍यायामशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्‍ली हॉल व इतर तत्‍सम ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्ये, इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल. सर्व धार्मिक स्‍थळे, पुजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्‍यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्‍यादीवर बंदी राहील.

जिल्ह्यात सायंकाळी पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू

संचारबंदी कालावधीत सायंकाळी पाच ते सकाळी सात यावेळेत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्‍यावश्‍यक सेवेकरिता नेमण्‍यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्‍तव रुग्‍ण व त्‍यांच्‍यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तींच्‍या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.

आरोग्‍य सेतूचा वापर करावा

आरोग्य सेतुचा वापरामुळे कोव्हिड-१९ आजाराच्‍या प्रादुर्भावात त्‍वरीत सूचना मिळते व त्‍याचा फायदा व्‍यक्‍तीस व समाजाला सुध्‍दा होतो. त्‍यामुळे ॲन्ड्राइड फोनचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी मोबाईल मध्‍ये आरोग्‍य सेतू अॅप डाऊनलोड करावे. शासकिय कार्यालय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्‍या व इतरांच्‍या सुरक्षितेसाठी आरोग्‍य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील. नांदेड जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्‍य सेतु अॅप डाऊनलोड करुन त्‍याचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.  

नांदेड जिल्‍हा नॉनरेड झोनमध्‍ये

आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने धोकादायक वयोगट असणारे ६५ वर्षाचे वरिल जेष्‍ठ नागरिक, अनेक व्‍याधी असणारे व्‍यक्‍ती, गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले यांनी टाळेबंदी काळात अत्‍यावश्‍यक काम, आरोग्य कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही. त्‍यांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. नांदेड जिल्‍हा नॉनरेड झोनमध्‍ये असल्‍याने आदेशातील परिशिष्‍ट तीन मध्‍ये नमुद प्रमाणे आस्‍थापने व दुकाने प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील दुकाने व खाजगी आस्‍थापनांना केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्‍यास मुभा दिली आहे. परंतू सर्व शासकिय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने वैद्यकिय अत्‍यावश्‍यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकिय दवाखाने व औषधालये हे पुर्णवेळ चालू राहतील.

हे सुरु राहतील

जिल्‍ह्यातील सर्व शासकीय कार्यालय, बँकेचे सर्व व्‍यवहार पुर्वी दिलेल्‍या निर्देश, अटी शर्तीनुसार  कार्यालयीन वेळेत चालू राहतील. क्रीडा कॉम्‍पलेक्‍स आणि स्‍टेडिअम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्‍यायामासाठी मोकळी राहील. तथापि या ठिकाणी प्रेक्षक आणि ग्रुप ॲक्टीव्हिटीजसाठी मुभा राहणार नाही. सर्व शारीरिक व्‍यायाम व त्‍यासंबंधीत इतर क्रिया सामाजिक अंतर राखुन करता येतील.

या नियमाचे पालन करा

सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस दुचाकी वाहन एक व्‍यक्‍ती, तीन चाकी वाहन एक अधिक दोन व्‍यक्‍ती, चार चाकी वाहनासाठी एक अधिक दोन व्‍यक्‍तींना मुभा राहील. नांदेड जिल्‍ह्यांतर्गत बससेवा जास्‍तीतजास्‍त ५० टक्‍के क्षमतेनुसार सुरु करण्‍यास मुभा देण्‍यात येत आहे. परंतु सामाजिक अंतर व स्‍वच्‍छतेची उपाययोजना करणे आवश्‍यक राहील. सर्व दुकाने, बाजारापेठ सुरु ठेवण्‍यास मुभा देण्‍यात येत आहे. परंतु उक्‍त दुकाने, बाजारपेठच्‍या ठिकाणी गर्दी वाढल्‍यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गत आदेशाचे पालन करण्‍यात येत नसल्‍याचे दिसून आल्‍यास दंडात्‍मक व कायदेशिर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्‍यात येईल.

प्रतिबंधीत क्षेत्रामध्‍ये केवळ जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा,अत्‍यावश्‍यक वैद्यकीय सेवांना मुभा

वरील बाबींपैकी प्रतिबंधीत क्षेत्रामध्‍ये केवळ जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा तसेच अत्‍यावश्‍यक वैद्यकीय सेवांना मुभा राहील. जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमीत केलेल्या ता. चार जून रोजीच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्‍था (विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा) या ठिकाणचे कर्मचारी यांना फक्‍त अध्‍यापना व्‍यतिरिक्‍त इतर कामाकरिता कार्यालयात उपस्थित राहून उत्‍तर पत्रिकांचे मुल्‍यांकन आणि परिक्षांचे निकाल यासारखे व इतर कार्यालयीन कामे करण्‍यासाठी मुभा राहील. जिल्‍हयातील मंगल कार्यालयाच्‍या ठिकाणी केवळ लग्‍नसंमारंभाच्‍या आयोजनाची मुभा सात व आठ जून रोजी आदेशातील नियम व अटींच्‍या अधिन राहून राहील. तसेच सात जुलै रोजीच्या आदेशान्वये निवास व्‍यवस्‍था असलेले हॉटेल, अतिथीगृह व लॉज चालू ठेवण्‍यासाठी दिलेली मुभा उक्‍त आदेशात नमुद नियम व अटींच्‍या अधिन राहून लागु राहील.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT